मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

अकोला : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार एकनाथ शिंदे यांनी बहाल केला आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडण्याच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(NCP […]

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा थेट जनतेतूनच निवडावा; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:55 PM

अकोला : नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडले जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार एकनाथ शिंदे यांनी बहाल केला आहे. नगराध्यक्ष, सरपंच थेट लोकांमधूनच निवडण्याच्या घोषणेनंतर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडला गेला पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी(NCP MLA Amol Mitkari) यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा जनतेतून निवडावा अशी मागणी केली आहे. ही मागणी करताना अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली आहे.

थेट जनतेतून संरपंच निवडणार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन एक घोषणा केली आहे. सरपंच आणी नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार. थेट लोकांमधून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडावा असे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जर वाटत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील जनतेतून निवडला गेला पाहिजे असं विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

आमदार पळवून, चोरून नेऊन मंत्र्यांची निवड करणे अयोग्य

आमदार पळवून, चोरून नेऊन असं घाबरण्यासारखं अशी निवड अयोग्य आहे. त्याच्यामुळे हा निर्णय अंमलात आणत असताना कृषी मंत्री आणखी वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सुद्धा जनतेतून निवडून आणण्याच धाडस करा असा सल्लाही मिटकरी यांनी दिला आहे. जनतेतून निवडून सरपंच आला पाहिजे हा निर्णय म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या अपमान आहे अशी टीका मिटकरी यांनी केली.

शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार

बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदान (voting) करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. 2020 ला हे अधिकार रद्द करण्यात आले होते. मात्र, आता मुख्यमंत्र्याच्या घोषणेप्रमाणे नगराध्यक्ष आणि सरपंच थेट लोकांमधून निवडले जाणार आहेत. इतकेच नाही तर बाजार समितीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Rights) मिळणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.