ताईला सगळं माहितीय… विनयभंगाचा कट कुणी रचला? जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटचा रोख कुठे?

मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Nov 30, 2022 | 12:02 PM

आव्हाड यांच्या ट्विटचा रोख कुणाकडे आहे? कटात सहभागी असणारे कोण आहेत? याची चर्चा आता सुरु आहे..

ताईला सगळं माहितीय... विनयभंगाचा कट कुणी रचला? जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटचा रोख कुठे?
Image Credit source: social media

मुंबईः मुंब्रा येथील आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात दाखल झालेला विनयभंगाचा गुन्हा नेमका कुणाच्या संगनमताने नोंद झाला, यासंबंधीचं महत्त्वाचं ट्विट आव्हाड यांनी केलंय. विवियाना मॉलमध्ये (Viviana Mall) झालेल्या धक्काबुक्कीत मनसे (MNS) नेत्याने जसे स्पष्ट केले, तशीच स्थिती 354 च्या गुन्ह्याची असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणालेत. या कोणत्याही कटात मनसे नेत्याचा सहभाग नव्हता, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे. तर ताईला सगळं माहिती आहे, असंही ते म्हणालेत.

जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंगाच्या गुन्हावर ट्विट केलंय. त्यात त्यांनी लिहिलंय…. विवियाना मॉलमध्ये झालेल्या गदारोळा नंतर माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता. पण तो फसला. त्यात मनसेच्या कुठल्याही नेत्याचा सहभाग नव्हता. ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला तेच रचत होते… विवियानाच्या तक्रारदरावर दबाव टाकून कट रचला. ह्यात इतर कुठल्याही पक्षाचा संबंध नाही…

त्यापुढील ट्विटमध्ये आव्हाड यांनी लिहिलंय- तक्रारदरानी स्वतः कबूल केले की जितेंद्र आव्हाडनी मला बाहेर काढले. तर मग माझे नाव गुन्ह्यात आले कसे? मनसेच्या ठाण्याच्या नेता जर पोलिस स्टेशनला होता तर हे त्यानी थांबवायला हवे होते.. . पण 354 च्या कटात तो नव्हता हे सत्य आहे .. ताईला सगळे माहीत आहे…

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटमधील ताई म्हणजे भाजपाच्या पदाधिकारी रीदा राशिद. यांनीच मुंब्रा येथील घटनेत जितेंद्र आव्हाड यांनी माझा विनयभंग केला, अशी तक्रार दिली. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रीदा राशिद यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाची तक्रार केल्यानंतर आव्हाड यांचा संताप झाला आहे. बाकी कोणतेही गुन्हे चालतील पण 354 चा गुन्हा दाखल करणे हे राजकीय सूडाचे कृत्य असल्याचं आव्हाड म्हणाले होते.

आव्हाड यांच्याविरोधात मनसेने हे षडयंत्र रचल्याची चर्चा स्थानिक पातळीवर दबक्या आवाजात सुरु होती. मात्र आव्हाड यांनी वरील ट्विटवरून यात मनसेचा हात नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आव्हाड यांच्या ट्विटचा रोख कुणाकडे आहे? कटात सहभागी असणारे कोण आहेत? याची चर्चा आता सुरु आहे..

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI