आवडता खासदार कोण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजप खासदाराचं नाव

48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे आपल्या आवडत्या खासदार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं

आवडता खासदार कोण? सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजप खासदाराचं नाव

जळगाव : दिल्लीत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 48 खासदारांपैकी आवडतं कोण? या प्रश्नाचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आणि जळगावचा आवाज संसदेत मांडणाऱ्या रक्षा खडसे, आपल्या आवडत्या महिला खासदार असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. (Supriya Sule names favorite MP)

48 खासदारांमध्ये सुसंस्कृत आणि अभ्यासू असलेल्या रक्षा खडसे या माझ्या आवडत्या महिला खासदार आहेत. धडपड करणारे नेतृत्त्व म्हणून मला त्यांचं कौतुक वाटतं, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंवर स्तुतिसुमने उधळली. रक्षा खडसे या सलग दुसऱ्यांदा जळगावातून लोकसभेच्या खासदारपदी निवडून आल्या आहेत.

शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे आयोजित ‘उडान : संजीवनी नव-उद्योजकांसाठी’ या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सुळे बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.

VIDEO : ‘आता अजित पवारांबाबत महत्त्वाची बातमी!’ स्टुडिओमध्ये सुप्रिया सुळे न्यूज अँकरच्या भूमिकेत

कौशल्य विकास प्रशाळा तसेच उद्योजकता विकास मंचातर्फे राबवण्यात येणाऱ्या ‘उडान’ योजने अंतर्गत नवउद्योजकांना पाठबळ म्हणून विविध साहित्य आणि यंत्रसामुग्रीचे सुप्रिया सुळेंच्या हस्ते वितरण करण्यात आले.

‘विद्यार्थिनींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवण्यासाठी डॉ. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूरक आहेत. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रयत्न करुन विद्यार्थिनींना सहकार्य मिळवून देईन. तसेच मोठ्या फॅशन डिझायनिंग कंपन्या आणि डिझायनरसोबत महाविद्यालयाचा करार करण्यासाठीही मी प्रयत्नशील राहीन. यामुळे विद्यार्थिनींना स्वत:ला यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविता येईल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule names favorite MP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI