AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले’; चाकणकरांचा जहरी वार

बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले, असा जहरी वार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राणा पत्नी-पत्नीवर केला आहे. (NCP Rupali Chakankar Attacked Navneet Rana And Ravi Rana)

'बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले'; चाकणकरांचा जहरी वार
रुपाली चाकणकर, रवी राणा आणि नवनीत राणा
| Updated on: Jul 07, 2021 | 2:20 PM
Share

मुंबई : बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, असा जहरी वार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राणा पती-पत्नीवर केला आहे. नवनीत राणा (Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. याच पार्श्वभूमीवर चाकणकरांनी राणा पती-पत्नीवर शरसंधान साधलं आहे. (NCP Rupali Chakankar Attacked Navneet Rana And Ravi Rana)

“बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी बबली निघाले”

रूपाली चाकणकर सातत्याने म्हणजेच संधी मिळेल तेव्हा नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागत असतात. पाठीमागच्या महिन्यात हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करुन त्यांना दणका दिला. तर काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. हाच धागा पकडत घालत चाकणकर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून हल्लाबोल केलाय. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर तोफ डागलीय.

रवी राणा यांनी राजदंड पळवला

महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन काल संपन्न झालं. हे अधिवेशन महाविकास आघाडी सरकारने गाजवलं. विरोधक असलेल्या भाजपला ठाकरे सरकारने बॅकफूटवर ढकललं. यात मॅन ऑफ द मॅच ठरले ते कोकणातले भास्कर जाधव… भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन करून पहिल्या दिवशीच सत्ताधारी विरोधकांवर हावी झाले… दुसऱ्या दिवशीही 12 आमदारांच्या निलंबनाचा निषेध करण्यासाठी विधिमंडळ कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय भाजपने घेतला. यावेळी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून भाजपने प्रति विधानसभा भरवली. या प्रती विधानसभेतही मोठा गोंधळ आणि राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

याच दरम्यान आमदार रवी राणा यांनी विधानसभेत एन्ट्री केली आणि त्यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोरचा राजदंड पळवला. “या राज्यात शेतकऱ्यांचे, कामगारांचे, महिलांचे, ओबीसी आणि मराठा बांधवांचे प्रश्न ऐरणीवर आहेत… त्यावर आपण चर्चा करावी…सत्यासंदर्भातलं माझं निवेदन तात्काळ स्वीकारा…” असं तालिका अध्यक्षांना रवी राणा म्हणाले.. त्यावर तालिका अध्यक्षांनी देखील तितकीच आक्रमक भूमिका घेत, “अध्यक्ष थेट निवेदन स्वीकारत नाहीत… तुमचं निवेदन खाली जमा करा…” असं सांगत विधिमंडळात सर्व घटकांवर चर्चा होत आहे, तुम्ही सहभाग नोंदवा, तुम्हाला पुरेपुर संधी दिली जाईल, पण स्टंट बाजीला येथे कुठला थारा नाही…. तुम्ही जरी राजदंड पळवला तरी कामकाज थांबणार नाही” असं जाधवांनी ठणकावून सांगितलं…!

नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द

युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचं जात प्रमाणपत्र जून 2021 ला हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. तेव्हापासून त्यांच्यावर जात लपविल्याचा आरोप होतोय.

(NCP Rupali Chakankar Attacked Navneet Rana And Ravi Rana)

हे ही वाचा :

खासदार नवनीत राणा यांना धक्का, जात प्रमाणपत्र कोर्टाकडून रद्द

Navneet Rana: कोण आहेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या खासदार नवनीत राणा? 

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.