शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

“आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी... म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही! थेट राष्ट्रवादीची ऑफर होती" असा दावा फडणवीस यांनी केला होता.

शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा फडणवीसांना प्रतिप्रश्न

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जर शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी विचारला आहे. भाजपला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण शरद पवारांनी भूमिका बदलली, असा दावा फडणवीस यांनी काल केला होता. (NCP Vidya Chavan on Devendra Fadnavis Allegations about BJP NCP alliance offer)

देवेंद्र फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत. ते करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जर त्यांना शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार चांगलं काम करत आहे, हे फडणवीस यांनी स्वीकारायला हवं, असंही विद्या चव्हाण म्हणाल्या.

“आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी… म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार नाही! थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला होता. राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीसोबतचे अनेक गौप्यस्फोट केले.

काय म्हणाले फडणवीस?

“आज तुमच्यासमोर गौप्यस्फोट करतो की, दोन वर्षापूर्वी एक स्थिती अशी होती की राष्ट्रवादी आणि भाजप सोबत यायचं असा निर्णय झाला. राष्ट्रवादी आणि भाजप जर सोबत येणार असेल तर शिवसेनेला बरोबर घ्यावं लागेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट सांगितलं होतं. जर एकत्र जायचं असेल आणि काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल तर शिवसेना आम्हाला सोबत लागेल.  शिवसेनेशिवाय आम्ही तुम्हाला घेत नाही, असा निरोप गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना दिला,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“निवडणुकीनंतर ज्यावेळी शिवसेना येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा आमच्याकडे कोणते पर्याय आहे याचा आम्ही विचार केला. त्यातल्या एका पर्यायात आम्हाला सोबत जाण्यासाठी थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाही. थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याबाबत योग्य त्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातील एका चर्चेत मी होतो. एका चर्चेत मी नव्हतो.”

हेही वाचा : सुजय विखेंना पक्षात का घेतलं? मेधाताईंना विधानपरिषद का नाकारली?, देवेंद्र फडणवीसांची उत्तरं

“एकदम टोकाच्या चर्चा झाल्या होत्या. ज्या चर्चा व्हायला हव्या त्या झाल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. आम्ही शांत बसून होतो. दोन ते तीन दिवस असे होते की आम्ही मनातून ठरवलं होतं की आपल्या हातात हे सरकार नाही. हे सरकार आता गेलं.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संबंधित बातमी :

आज गौप्यस्फोट करतोय, थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, चर्चाही झाल्या, पण पवारांनी भूमिका बदलली : फडणवीस

(NCP Vidya Chavan on Devendra Fadnavis Allegations about BJP NCP alliance offer)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *