AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद

काँग्रेस आणि भाजप या पक्षांना पर्याय देऊ असं सांगत काँग्रेससोबत आघाडीच्या शक्यता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी फेटाळून लावल्या.

गोवा विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा अ‍ॅक्शन प्लॅन, काँग्रेससोबत आघाडी नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला प्रभारीपद
| Updated on: Oct 28, 2020 | 1:27 PM
Share

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकांना दोन वर्षांचा अवधी असतानाही राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. पूर्ण ताकदीनिशी गोव्याच्या मैदानात उतरु, असं म्हणत माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांनी आताच दंड थोपटले आहेत. काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारीपद देऊ, असेही पटेल यांनी सांगितले. (NCP will contest 2022 Goa Assembly polls says Praful Patel)

“गोव्यातील सर्व 40 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तेव्हा असेल. आघाडी करायची झालीच, तर जागावाटपाचा फॉर्म्युला तेव्हा निश्चित करता येईल” असं प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केलं. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पटेल यांनी पक्षाची गोव्यातील आगामी वाटचाल सांगितली.

समविचारी पक्षांच्या साथीने सरकार

काँग्रेस आणि भाजप या पक्षांना पर्याय देऊ असं सांगत काँग्रेससोबत आघाडीच्या शक्यता पटेल यांनी आताच फेटाळून लावल्या आहेत. राष्ट्रवादी समविचारी पक्षांच्या साथीने गोव्यात पुढील सरकार स्थापन करु शकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला. म्हणजेच स्वबळावर निवडणूक लढवून काँग्रेस किंवा भाजपेतर पक्षांच्या साथीने राष्ट्रवादीचा सत्तास्थापनेचा विचार दिसत आहे.

ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारीपद

पुढील दीड वर्ष आम्ही मेहनत घेऊ. महाराष्ट्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारी करु, असा अ‍ॅक्शन प्लॅनही प्रफुल पटेल यांनी सांगितला. 22 नोव्हेंबरला पणजीमध्ये राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय सुरु करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारमधील कोणत्या ज्येष्ठ मंत्र्याला गोव्याचे प्रभारीपद दिले जाणार, याची चर्चा रंगली आहे.

“राष्ट्रवादी गोव्यात विश्वासार्ह आणि पर्यायी नेतृत्व देईल. पक्षाचे अनेक समर्थक गोव्यात आहेत. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी ते दिवसरात्र मेहनत करतील आणि निवडणुकांना सामोरे जातील” अशी खात्रीही पटेल यांना वाटते.

हेही वाचा : शिवसेना-अकाली दलाच्या एक्झिटचा फटका, भाजपला राज्यसभेत ‘भरपाई’ची संधी

2017 मध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 17 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता, भाजपच्या 13 जागा आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचा केवळ एकच आमदार निवडून आला. बेनॉलिम मतदारसंघातून चर्चिल अलेमाऊ हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले. (NCP will contest 2022 Goa Assembly polls says Praful Patel)

2019 मध्ये मोठ्या राजकीय घडामोडींनंतर भाजपचे प्रमोद सावंत मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, तर काँग्रेस विरोधीपक्षात गेली. भाजपचे 27, तर काँग्रेसचे अवघे पाच आमदार आहेत.

संबंधित बातम्या :

खडसेंच्या पक्षांतरावेळीच प्रफुल पटेलांच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीला रामराम

खडसे, आदिती नलावडे, आनंद शिंदे विधान परिषदेवर?; राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू

(NCP will contest 2022 Goa Assembly polls says Praful Patel)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.