पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा, राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड (Arun Lad) यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे. अधिकृत निकाल येण्याआधीच मतमोजणी केंद्राबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघावर महाविकास आघाडीचा झेंडा, राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 7:58 AM

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघावर (Pune graduate constituency election) महाविकास आघाडीने झेंडा फडकवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad) यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत अरुण लाड यांना तब्बल 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत, तर भाजप उमेदवार संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत. लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. लाड यांनी 1 लाख 14 हजार 137 मतांचा कोटा पूर्ण करून विजय मिळवला आहे. (NCP’s Arun Lad wins Pune graduate constituency election)

दरम्यान, अंतिम निकाल येण्यापूर्वीच लाड यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी सुरु केली होती. दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजय निश्चित मानला जात होता. आता अंतिम निकाल समोर आले आहेत. अरुण लाड यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड (Arun Lad), भाजपचे संग्रामसिंह देशमुख (Sangram singh Deshmukh) आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांच्यात तिरंगी लढत होईल असे म्हटले जात होते. परंतु अरुण लाड मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर होते. या निकालांवरुन स्पष्ट झाले आहे की, ही निवडणूक एकतर्फी झाली आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाल्याने राष्ट्रवादीच्या पाटलांनी भाजपच्या पाटलांना पराभूत केले, असे म्हटले जात आहे.

औरंगाबादेत दुसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांची मुसंडी, 34 हजार मतांची आघाडी

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण 34 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु आहे. रात्री जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांमध्ये निकालाचे कल स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून जल्लोष सुरु आहे.

नागपुरात महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांना आघाडी

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी चुरशीची लढत अपक्षित होती. या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत, तर दुसऱ्या फेरीतही भाजप उमेदवार पिछाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना 7262 मतांनी आघाडी मिळाली आहे.

संबंधित बातम्या

MLC election Maharashtra 2020 result | ‘एकीचे बळ’ भाजपला पडणार भारी? चार जागांवर महाविकास आघाडीची सुस्साट घौडदौड

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; पहिल्या फेरीत अभिजित वंजारी आघाडीवर; संदीप जोशींना धक्का

(NCP’s Arun Lad wins Pune graduate constituency election)

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.