AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raju Shetti | होय, जयंत पाटील घरी आले होते, विधानपरिषदेवर चर्चा झाली : राजू शेट्टी

जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली.NCP कडून राजू शेट्टींना विधानपरिषदेवर पाठवण्याची तयारी आहे. (NCP may nominate Raju Shetti Vidhan Parishad)

Raju Shetti | होय, जयंत पाटील घरी आले होते, विधानपरिषदेवर चर्चा झाली : राजू शेट्टी
| Updated on: Jun 11, 2020 | 2:13 PM
Share

कोल्हापूर : राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याची शक्यता आहे. (NCP may nominate Raju Shetti Vidhan Parishad) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी नुकतीच राजू शेट्टी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये याबाबत चर्चा झाली. जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांची दोन दिवसांपूर्वी भेट झाली. राजू शेट्टी यांच्या घरात दोघांमध्ये चर्चा झाली.

आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी जयंत पाटील घरी आले होते, असं राजू शेट्टी म्हणाले. यावेळी या दोघांमध्ये विधानपरिषदेच्या जागांवरुन चर्चा झाल्याचं राजू शेट्टी यांनीच सांगितलं. (NCP may nominate Raju Shetti Vidhan Parishad)

राजू शेट्टी म्हणाले, “मंत्री जयंत पाटील हे माझ्या आईच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसापूर्वी आले होते. त्याचवेळी काही अनौपचारिक गप्पा झाल्या. बोलता बोलता ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या समझोत्याप्रमाणे, विधानपरिषदेची एक जागा देण्याबाबत ठरलं होतं. त्यावेळी आम्हाला काही देता आलं नाही, पण आता पवारसाहेब कोकण दौऱ्यावरुन मुंबईत आल्यावर चर्चा करुन निर्णय करण्याचा प्रयत्न करु. मला वाटतंय आठवडाभरात पवार साहेबांसोबत बैठक होईल. त्यावेळी होय की नाही ते ठरेल, असं राजू शेट्टी म्हणाले.

विधानपरिषदेबाबत चर्चा राज्यपाल नियुक्त 12 जागांची निवड होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या कोट्यातील 4 पैकी एक जागा राजू शेट्टींना देण्याच्या तयारीत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान ठरल्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानीला विधानपरिषदेची एक जागा देणार आहे. त्याबाबतच जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

विधानपरिषद निवडणूक

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा येणार आहेत. काँग्रेस आपल्या राजकीय नेत्याला राज्यपाल निर्देशित उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.

(NCP may nominate Raju Shetti Vidhan Parishad)

संबंधित बातम्या 

विधान परिषद निवडणूक : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी काँग्रेसची फिल्डिंग?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.