AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका

हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, असा सवाल करत बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका
| Updated on: Nov 16, 2020 | 7:45 AM
Share

मुंबई :  हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे?, असा सवाल करत बीडमध्ये तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड (Beed Acid Attack). हल्ल्याचा भाजप नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. हाथरसवरुन राजकारण करणारे आता कुठं गेले?, असा सवालही त्यांनी यानिमित्ताने विचारला आहे. (Nilesh Rane Attacked CM Uddhav Thackeray over beed Acid Case)

राज्यात सातत्याने महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना राज्य सरकार काहीही पावले उचलत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय,  “बीडमध्ये एका 22 वर्षीय तरुणीला अ‌ॅसिड टाकून ठार मारण्यात आलं. ही घटना दुर्दैवी आहे. हाथरसच्या नावाने गरळ ओकणाऱ्या राज्य सरकारचा आता कुणी गळा धरला आहे? महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले आहेत”.

बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा अत्यंत वेदनादायी प्रकार घडला आहे. अखेर 12 तासानंतर तिची मृत्यूशी झुंज संपली.

नेमकं काय घडलं?

पुणे येथे राहत असलेले दोन प्रेमी युगल गावाकडे जात होते. मात्र, बीडच्या येळम्ब परिसरात दोघात वाद झाला आणि रागाच्या भरात प्रियकराने चक्क प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. शनिवारी ही घटना घडली. जखमी प्रेयसीला बीडच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 15 नोव्हेंबर रोजी तिचा मृत्यू झाला.

मृत पीडिता ही नांदेड जिल्ह्यातील शेळगाव येथील रहिवासी आहे. त्याच गावातील अविनाश राजूरे याच्यासोबत गेल्या काही महिन्यांपासून ती पुण्यात लिव्ह इनमध्ये राहत होती.

देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील पीडितेचा विवाह तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र, गावातच असलेल्या अविनाश राजूरे या तरुणावर तिचे प्रेम होते. लग्नानंतरही प्रेमाच्या आणाभाका घेत आयुष्यभर साथ राहण्याच्या एकमेकांनी शपथा घेतल्या. दोघांनीही गावातून पलायन करुन पुणे गाठले. मात्र, तिथे या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

अविनाशला दुसरे लग्न करण्यासाठी घरातील मंडळीने घाट घातला होता. त्यामुळे अविनाशने गावाकडं जाण्यासाठी पीडितेला सोबत घेतले. दोघेही पुण्यावरुन दुचाकीवर गावाकडे निघाले. बीडजवळ येताच अविनाशने तिच्या अंगावर अ‍ॅसिड फेकले आणि तिथून पसार झाला. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर परिसरातून जाणारे नागरिक तिच्या मदतीला धावले.

जखमी पीडितेला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा आज मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी पीडितेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर पोलिसांनी आरोपी अविनाशविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

(Nilesh Rane Attacked CM Uddhav Thackeray over beed Acid Case)

संबंधित बातम्या :

लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या प्रियकराचा अ‍ॅसिड हल्ला, प्रेयसीचा दुर्दैवी मृत्यू

Beed Acid Attack : प्रेयसीला अॅसिड टाकून जाळणाऱ्या नराधमाला नांदेडमध्ये अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.