संजय राऊत यांना टीव्ही, तर उद्धव ठाकरेंना कॅडबरी द्या : निलेश राणे

शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे, तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या, अशी टीका माजी खासदार निलेश राणे (nilesh rane criticized on shivsena) यांनी केली आहे.

संजय राऊत यांना टीव्ही, तर उद्धव ठाकरेंना कॅडबरी द्या : निलेश राणे


मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना टीव्ही आणि लाईट बिलचे पैसे, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या, अशी टीका माजी खासदार निलेश राणे (nilesh rane criticized on shivsena) यांनी केली आहे. सध्याच्या राजकीय सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत (nilesh rane criticized on shivsena) यांच्यावर टीका केली.

“संजय राऊत इतके गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकी राहुद्या त्यांना अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या आणि उध्दव ठाकरे यांना कॅडबरी चॉकलेट द्या. बिचाऱ्यांना वाईट वाटलं की त्यांना खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखे वाटलं त्यांना बघून”, असं निलेश राणे यांनी ट्वीट केले.

एकिकडे राज्यात सत्ता संघर्षावरुन भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार वाद सुरु आहे. तर दुसरीकडे नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे सोशल मीडियावर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर राज्यात गेले 15 दिवस सत्ता स्थापनेवरुन सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. राज्यात कुणाचा मुख्यमंत्री बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र आजच्या एकूण राजकीय घडामोडीवरुन शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन सरकार स्थापन करतील असं वाटत नाहीये. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन सरकार स्थापन करणार का?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI