“पवारसाहेब, बरं झालं पराभवाच्या भीतीने माघार घेतली!, मुख्यमंत्री म्हणतीलच, तुम्ही आमचे राष्ट्रपती”, निलेश राणेंचा टोला

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर निलेश राणे यांनी भाष्य केलंय. त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरून पवारांना टोला लगावला आहे.

पवारसाहेब, बरं झालं पराभवाच्या भीतीने माघार घेतली!,  मुख्यमंत्री म्हणतीलच, तुम्ही आमचे राष्ट्रपती, निलेश राणेंचा टोला
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 2:22 PM

मुंबई : सध्या निवडणुकींचं वारं वाहतंय. राज्यात विधान परिषदेची निवडणूक होतेय. तर राष्ट्रपतीपदासाठीही (Presidential Election) निवडणूक होतेय. अश्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) नावाची चर्चा होतेय. मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाही, असं शरद पवारांनी म्हटलंय. त्यावर आता निलेश राणे यांनी टीका केली आहे.”पवारसाहेब,पराभवाच्या भीतीने माघार घेतली ते बरं झालं!, मुख्यमंत्री म्हणतीलच, तुम्ही आमचे राष्ट्रपती”, असं निलेश राणे (Nilesh Rane) म्हणाले आहेत.

निलेश राणेंकडून पवारांची खिल्ली

शरद पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर निलेश राणे यांनी भाष्य केलंय. “पवारसाहेब, राष्ट्रपती निवडणुक पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते म्हणतील तुम्हाला, “मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय,आज पासून तुम्ही राष्ट्रपती”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

निलेश राणे यांचं ट्विट

मी रेसमध्ये नाही- पवार

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधकांची नवी दिल्लीत बैठक होतेय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतभाजपला तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी स्वत: ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणूनही चर्चेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही पवारांच्या नावासाठी अनुकुलता दर्शवली आहे. मात्र, विरोधकांच्या या बैठकीपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारयांनी मोठं विधान केलं आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या रेसमध्ये नाहीये, असं खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे बैठकीत पवारांच्याच नावावर चर्चा होणार की आणखी काही नावं राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून पुढे येतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.