AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी टाकला नवा डाव

नागपूर पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट निर्माण झाला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी नवा डाव टाकला आहे.

Nitesh Karale : पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी टाकला नवा डाव
nitesh karale Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 05, 2026 | 10:50 AM
Share

नागपूर पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसने अभिजीत वंजारींना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन मोठ्या पक्षाने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता बंडखोरी सुरू झाली आहे. भाजपच्या अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर शरद पवार गटाचे नितेश कराळे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे.

शरद पवार गटाचे नितेश कराळे हे आज सोमवारी नागपूर पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नागपूरच्या संविधान चौकातून रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कराळे यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. परंतु खुद्द नितेश कराळे यांनी बंडखोरीवा दावा खोडला आहे. पदवीधर विधानपरिषदेच्या निवडणुकीत चिन्ह राहत नाही, त्यामुळे याला बंडखोरी म्हणता येणार नसल्याचे मत कराळे गुरुजींनी व्यक्त केलं आहे. तसेच मला मोठ्या संख्येने मतदारांचा प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास कराळे मास्तरांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादीसह काँग्रेस, शिवसेना, भाजप तसेच सर्वपक्षीय अनेकांचा पाठिंबा असल्याचा विश्वास कराळेंनी व्यक्त केला आहे. हा पदवीधराचा मतदारसंघ आहे आणि तिथे पदवीधरसाठी लढणारा माणूस राहिला पाहिजे.  प्रचलित व्यवस्थेमध्ये एखादा प्रस्थापित माणूसच पाठवायचा आणि त्याच्या शाळा-कॉलेज वाचवण्यासाठी किंवा एखादा माजी आमदार जो त्याचं प्रस्थ वाचवण्यासाठी त्यांना सीट देऊन आणि घराणेशाही चालवून हे कुठेतरी प्रस्थापित पदवीधरांचे प्रश्नच मांडत नाहीत, असा आरोप कराळे यांनी केला.  त्याच्यामुळे तिथे एखादा शेतकऱ्याच्या पोरासाठी लढणारा, बेरोजगार युवकासाठी लढणारा, कर्मचाऱ्यांचे मुद्दे घेऊन लढणारा एखादा पदवीधर सुशिक्षित माणूस जर तिथे गेला, तर तो चांगले मुद्दे मांडू शकेल… त्याच्यामुळे बंडखोरी याला म्हणता येणार नाही, असेही त्यांनी म्हटलं. दरम्यान, कराळे मास्तर काही आठवड्यांपूर्वी तुरुंगातून जामिनावर बाहेर आले आहेत. एका विधानामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काही आठवड्यांनी कराळे मास्तर हे जामिनावर बाहेर आले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कराळे मास्तरांनी समाजकार्य, राजकारण सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद