AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मित मच्छार यांच्याबद्दलही 2 शब्द बोला..; नसीरुद्दीन शाह यांना पियुष मिश्रा यांचे थेट प्रश्न, CJP आंदोलनानंतर टोला

नसीरुद्दीन शाह यांनी सीजेपीच्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर पियुष मिश्रा यांनी त्यांना काही परखड प्रश्न विचारले आहेत. इतकंच नव्हे तर यापुढे तुम्ही कुठलंही वक्तव्य केलात तर त्यावर माझं उत्तर मिळेल, असंही त्यांनी म्हटलंय.

स्मित मच्छार यांच्याबद्दलही 2 शब्द बोला..; नसीरुद्दीन शाह यांना पियुष मिश्रा यांचे थेट प्रश्न, CJP आंदोलनानंतर टोला
पियुष मिश्रा, नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2026 | 10:59 AM
Share

अभिनेते पियुष मिश्रा आणि नसीरुद्दीन शाह हे दोघेही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नसीरुद्दीन शाह नुकतेच मुंबईत पार पडलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर पियूष मिश्रा यांनी त्यांना काही थेट सवाल केले आहेत. विशेष म्हणजे, आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याचा उल्लेख करत नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्याबद्दलही भूमिका मांडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी इतरही काही घटनांचा उल्लेख केला.

गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क इथं सीजेपीकडून आंदोलन करण्यात आलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. या आंदोलनाला काही राजकीय आणि सामाजिक व्यक्तींसोबतच मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही पाठिंबा दिला. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह काही कलाकार आंदोलनस्थळी पोहोचले होते. नसीरुद्दीन शाह यांच्या या सहभागानंतर पियुष मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी नसीरुद्दीन शाह यांना संबोधित करत काही मुद्दे उपस्थित केले.

काय म्हणाले पियुष मिश्रा?

पियुष मिश्रा यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “नसीर साहेब, आदाब अर्ज करतो. मी पियुष मिश्रा, तुमचा जुना परिचित. तुम्ही अभिजीत दिपके यांची भेट घेतलीत, हे पाहून मला खूप आनंद झाला. सर, नुकतीच एक मोठी दुर्घटना होता होता टळली. ही घटना तेल अवीवहून जाणाऱ्या फ्लाइटमध्ये, फ्लाय दुबईच्या फ्लाइट 1073 मध्ये घडली. यावेळी मिस्टर स्मित मच्छार यांनी अतिशय धाडस दाखवत 180 लोकांचे प्राण वाचवले. त्यांच्याबद्दलही थोडं बोला, सर. त्यांचं कौतुक करा, त्यांना शुभेच्छा द्या.”

पहा व्हिडीओ-

पुढे ते म्हणाले, “दुसरी गोष्ट म्हणजे सर, लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्येही एक संदेश पाठवा. तिथेही मुलं शिकतात. तिथे एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी मुलींचे केस धरून त्यांना ओढलंय. मोठा गोंधळ झाला, जाळपोळ झाली. तुम्ही म्हणाला होतात ना की, ‘मला जितकं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि एफटीआयआयने शिकवलं, तितकंच या मुलांनी मला शिकवलं आहे.’ त्यामुळे मला माहीत नाही की ही मुलं कधीपासून अभिनयाचे शिक्षक झाली. भेट झाली तर याचा खुलासा करा. पण तिथेही तितकीच गंभीर घटना घडली आहे. त्यामुळे कृपया तिथल्या मुलांप्रतीही संवेदना व्यक्त करा आणि त्यांच्यासाठी एक संदेश पाठवा.”

यानंतर पियुष मिश्रा यांनी झारखंडचा उल्लेख करत म्हटलं, “तिसरी गोष्ट म्हणजे सर, मी झारखंडसाठी तुमच्याकडे मदत मागितली होती. तेव्हा तुम्ही एका पाकिस्तानी शायरीकाराची कविता पाठवली होती. माफ करा सर, तिथे शायरीकाराची कविता नको होती. तिथे पीठ हवं होतं, डाळ हवी होती, भाकरी हवी होती, तिथे गूळ हवा होता, लिट्टी हवी होती, चोखा हवा होता. त्यांना पिझ्झा किंवा बर्गर नको होता, सर.”

आपलं म्हणणं संपवताना पियुष मिश्रा म्हणाले, “ठीक आहे सर? तर तुमचे आभार मानतो. आता तुम्ही जेव्हा जेव्हा कोणतंही वक्तव्य कराल, तेव्हा पियुष मिश्रांचं उत्तर तुम्हाला मिळेल. धन्यवाद सर, तुमचा मुलगा पियुष मिश्रा. इन्कलाब जिंदाबाद सर, थँक यू.”

दरम्यान, सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं. मुंबईत हे आंदोलन पार पडलं. नसीरुद्दीन शाह, विशाल ददलानी यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले आहेत.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद