AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके फक्त मुखवटा, त्याच्या मागे… राज्यातील बड्या नेत्याचा मोठा दावा, थेट पाकिस्तान..

अभिजीत दिपके यांच्याकडून मुंबईत मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर गुन्हे दाखल करण्यात आली. त्यातच पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अभिजीत दिपके पोहोचले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोठे आवाहन केले.

अभिजीत दिपके फक्त मुखवटा, त्याच्या मागे... राज्यातील बड्या नेत्याचा मोठा दावा, थेट पाकिस्तान..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 05, 2026 | 10:56 AM
Share

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काल काही राजकीय नेत्यांनी भेट दिली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुण्यात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, पुणे बंद पाडा. अभिजीत दिपके यांच्यावर आता भाजपाचे मंत्री नितेश राणे यांनी टीका केली. नितेश राणे यांनी म्हटले की, मी परत परत सांगतो की, अभिजीत दिपके हा फक्त मुकवटा आहे. त्याच्या मागे उमर खालिद आहे. तुम्ही सांगा ज्यावेळी जंतर मंतरवर आंदोलन सुरू होते, त्यावेळी पाकिस्तानमधून किती जास्त सोशल मिडिया अकाऊंट चालवली जात होती. भारतात अराजकता आणायची ही पाकिस्तानची भूमिका कायम राहिली आहे. पाकिस्तानचा अजेंडा राहिला आहे.

तोच अभिजीत दिपके पुढे घेऊन जात आहे. काहीच बदल नाही तीच भाषा आहे. तीच स्क्रिप्ट वाचून दाखवण्याचे काम सुरू आहे. बाकी काही नाही. भारतात अराजकता माजली तर सर्वात जास्त शिरकुंबा कोण खात बसणार तर पाकिस्तानची लोक. तीच भाषा आज हा अभिजीत दिपके करतोय. दिपके फक्त मुखवटा आहे, पाकचा अजेंडा दिपके पुढे नेतोय.

अमेरिकेतून अभिजीत दिपके भारतात दाखल झाले. नीट पेपरफुटीत त्यांनी आंदोलन पुकारले. जंतर मंतरवर त्यांनी आंदोलनाला सुरूवात केली. त्याच्या या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी जंतर मंतरवर पोहोचले. यासोबतच देशाच्या विविध शहरात विद्यार्थ्यांनी मोठे मोर्चे काढली. कॉकरोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली.

विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. त्यानंतर सरकारवरील दबाव प्रचंड वाढला. सरकारला अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. हा मोदी सरकारच्या काळातील पहिला राजीनामा ठरला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपके मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. याबाबत मुंबईत आंदोलनही झाले.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला...
आदिवासी विद्यार्थ्यांचा मुंबई मोर्चा पोलिसांनी रात्रीच अडवला, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद