AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा

संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीची नोटीस आल्याचा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane Sanjay Raut)

संजय राऊत यांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा, नितेश राणेंचा खळबळजनक दावा
| Edited By: | Updated on: Nov 29, 2020 | 12:15 AM
Share

हिंगोली : ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांच्या नातेवाईकांनादेखील ईडीच्या नोटिसा आल्याचा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. “प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे,” असं नितेश राणे म्हणाले आहेत. ते हिंगोलीत पत्रकार परिषदेत बोलत होते. (Nitesh Rane claims that Sanjay Raut relatives also received notice from the ED)

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. ठाकरेंची ही मुलाखत चांगलीच वादळी ठरली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या या मुलाखतीवर घणाघाती टीका केली. याच मुलाखतीवर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांचा समाचार घेतला. “प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई सुरू असताना याच प्रकरणात संजय राऊत यांच्याही नातेवाईकांना ईडीकडून नोटिसा पाठवण्यात आल्याची माझी माहिती आहे.” असं नितेश राणे म्हणाले.

नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच फडफड

प्रताप सरनाईक यांना ईडीकडून नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी सरनाईक यांची पाठराखण करत ईडीच्या कारवाईवर वेळोवेळी टीका केली आहे. यावर बोलताना, “संजय राऊतांच्या नातेवाईकांना नोटिसा मिळाल्यामुळेच ते जास्त फडफड करत आहेत,” असं नितेश राणे म्हणाले. तसेच, ईडीच्या कारवाईमुळेच राऊत हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले नव्हते ना?, अशीही मला शंका आहे, असेही नितेश राणे म्हणाले. (Nitesh Rane claims that Sanjay Raut relatives also received notice from the ED)

दरम्यान, संजय राऊत यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील कारवाईवरुन भाजपला लक्ष्य केलं. “चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा सत्ता आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, वीस-वीस वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत,” असं संजय राऊत 25 नोव्हेंबर रोजी म्हणाले होते. तसेच, “ईडीनं आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली आहे. आमच्या आमदार, खासदारांच्या घरासमोर ईडीनं तळ ठोकला तरी आम्ही घाबरणार नाही,” असा टोला त्यांनी भाजपला 24 नोव्हेंबरला लगावला होता.

संबंधित बातम्या :

घोटाळेबाज प्रताप सरनाईकांचं ठाकरे सरकार संरक्षण करतंय, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ईडी काही तुमच्या बापाची आहे का, असेल तर तुम्हाला 25 वर्ष घरी बसवू : संजय राऊत

प्रताप सरनाईकांना अडकवलं जातंय; कारवाई चुकीची हे आता जनतेलाही कळून चुकलंय : जयंत पाटील

(Nitesh Rane claims that Sanjay Raut relatives also received notice from the ED)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.