मुंबई दरवर्षी कशी तुंबते? गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र, नियोजनाचा सल्ला

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबईत निर्माण होणाऱ्या पूर स्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले आहे.

मुंबई दरवर्षी कशी तुंबते? गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र, नियोजनाचा सल्ला
Follow us
| Updated on: Oct 14, 2020 | 4:04 PM

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूर स्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहीले आहे. मुंबईतील पूर समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं गडकरींनी म्हटलं आहे. पूर स्थितीमुळं दरवर्षी मुंबईमध्ये जीवितहानी, वित्तहानी, इमारतींची पडझड, रस्त्यांचे नुकसान होते. मुंबईतील पुरांबाबत योग्य कार्यवाही करुन वर्षानुवर्षे या संकटाला तोंड देणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यात यावा, असं गडकरींनी म्हटलं आहे. (Nitin Gadkari wrote letter to CM Uddhav Thackeray and Sharad Pawar to solve flood water issue)

मुंबईत पुरामुळे दरवर्षी मोठं नुकसान होते. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, असा सल्ला देखील नितीन गडकरींनी दिला आहे. मुंबईत ड्रेनेज वॉटर आणि गटरलाईनच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा वापर करण्यात यावा , असेही गडरकरींनी सुचवले आहे.

पुराची समस्या सोडवण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. योग्य नियोजनपूर्वक पुराचे पाणी, ड्रेनेज, गडरलाईनचे पाणी ठाण्याकडे वळवून धरणात साठवता येईल. तिथे पाण्यावर प्रक्रिय करून नाशिक आणि अहमदनगर मधील शेतीला पाणी देता येईल, असेही गडकरींनी सुचवले आहे. पुराचे पाणी दुष्काळी भागात देखील वळवता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

रस्त्यांचं नुकसान

मुंबईत दरवर्षी  पुरामुळं रस्त्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. पूर येऊन गेल्यानंतर शासनाला स्वच्छता, आरोग्य सेवां पुरवणे अशी कामं करावी लागतात. या काळात मालमत्तांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्या दुरुस्तीकडं लक्ष देता येत नाही, मात्र, रस्ते तातडीनं दुरुस्त करावे लागतात, असे गडकरींनी निदर्शनास दिले.

मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करा

पारंपारिक पद्धतीनं बनवण्यात येणारे रस्ते अतिपाऊस आणि पुराच्या काळात खराब होतात. त्यामुळे मुंबईतील सर्व रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी सूचना गडकरींनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेचं उदाहरण नितीन गडकरींनी दिलं आहे.

कॉलन्यांमध्ये पाणी पूनर्वापर यंत्रणा उभी करावी, यामुळे मुंबई महापालिकेचे लाखो रुपये वाचतील. पुराचे पाणी, ड्रेनेजचं व्यवस्थापन या समस्या सोडवण्यासाठी एकात्मिक योजना राबवण्याची गरज आहे. ही समस्या सोडवण्यासाठीचा डीपीआर तयार करण्यासाठी एखाद्या आंतरराष्ट्रीय संस्थेला जबाबदारी देण्यात यावी. जल पर्यटन सेवा सुरू करण्यात यावी. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाची मदत होईलचं मुंबईच्या विकासासाठी पुढाकार घ्या, असं आवाहन नितीन गडकरींनी केलं आहे.

संबंधित बातम्या :

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची कोरोनावर मात

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण

(Nitin Gadkari wrote letter to CM Uddhav Thackeray and Sharad Pawar to solve flood water issue)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.