Sanjay Raut : आमदार, खासदार गेले म्हणजे पक्ष जात नाही, आम्ही पाच राहू, पण पक्ष मजबूत; राऊतांचं रोखठोक विधान

Sanjay Raut : आम्हाला ईडीच्या नोटिसा आल्या. आम्ही घाबरलो नाही. मी म्हणतो तुरुंगात टाका. तयारी आहे आमची. राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरूंगात आहेत. तरीही त्यांचा पक्ष फुटला नाही. पळून गेलेल्या आमदारांचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदिराचं होतं.

Sanjay Raut : आमदार, खासदार गेले म्हणजे पक्ष जात नाही, आम्ही पाच राहू, पण पक्ष मजबूत; राऊतांचं रोखठोक विधान
आमदार, खासदार गेले म्हणजे पक्ष जात नाही, आम्ही पाच राहू, पण पक्ष मजबूत; राऊतांचं रोखठोक विधान
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Jun 25, 2022 | 7:17 PM

मुंबई: 20-22 आमदार जातील, 40 आमदार जातील. आम्ही दोन-चारच राहू. आदित्य ठाकरे राहतील, सुनील राऊत राहतील, सुनील प्रभू राहतील.. आम्ही पाच राहू. पण या पाचातून पुढे कसं जायचं हे आम्हाला माहीत आहे. पक्ष जमिनीवर मजबूत आहे. आमदार गेले म्हणून पक्ष गेला असं होत नाही, खासदार गेले म्हणून पक्ष गेला असं होत नाही. शिवसेनेतून (shivsena)  कधीकाळी खासदारही गेले. नगरसेवकही गेले आहेत. पण शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली. पुन्हा आमदार, खासदार, नगरसेवक निवडून आणतील, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) म्हणाले. पळून गेलेल्या आमदाराचं कोणतंही काम मुख्यमंत्र्यांनी अडवलं नाही. आमदारांचं ऐकून घेण्यासाठीची जबाबदारी एकनाथ शिंदेवरच (Eknath Shinde) होती. दुसऱ्या क्रमांकाचा मंत्री असतो त्याच्यावर आमदारांशी संवाद साधण्याची सर्व जबाबदारी असते. गृहखात्यापेक्षाही मोठं खातं ते शिंदेंना दिलं. या राज्यात नगरविकास खाते कायम मुख्यमंत्र्यांकडेच राहतं. ते शिंदेंना दिलं, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत हे ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना बोलत होते. आम्हाला ईडीच्या नोटिसा आल्या. आम्ही घाबरलो नाही. मी म्हणतो तुरुंगात टाका. तयारी आहे आमची. राष्ट्रवादीचे दोन मंत्री तुरूंगात आहेत. तरीही त्यांचा पक्ष फुटला नाही. पळून गेलेल्या आमदारांचं शरीर वाघाचं अन् काळीज उंदिराचं होतं. ते नुसते डरकाळ्या फोडत राहिले. व्यासपीठावरून आम्ही वाघ… आम्ही वाघ… वाघाचे बच्चे… व्यासपीठावरून म्हणत होते. प्रत्यक्षात काय आहे हे आम्ही 72 तासात पाहिलं. आता जे रस्त्यावर उतरत आहेत ते खरे शिवसैनिक आहेत. अजून बरेच शिवसैनिक आहे बरं का. ते उतरले नाहीत. आता उतरतील, असं राऊत यांनी सांगितलं.

तर 24 तासात सरकार स्थापन केलं असतं

आता एक रस्त्यावरची लढाई आणि एक कायदेशीर लढाई आहे. कायदेशीर लढाईत अनिल देसाई, अरविंद सावंत अनिल परब काम करत आहेत. एक फार मोठी कायदेशीर टीम काम करत आहे. मी माझं काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं काम करत आहेत. शरद पवार आपलं काम करत आहेत. नाही तर या लोकांनी 24 तासात सरकार स्थापन केलं असतं. पण मी सांगतो ते नवीन सरकार स्थापन करत नाही, असंही ते म्हणाले. वर्षावर बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण सर्व बसले होते. तुम्ही पवारांवर अधिक फोकस टाकत आहात. प्रत्यक्ष भेटण्याची गरज नसते. संपर्काची साधनं भरपूर आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

या शिंदेंना मुख्यमंत्रीपद देऊ

या. एकनाथ शिंदेंना आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ. मी सांगतो उद्धव ठाकरेंना. ते येणारच नाही. या महाराष्ट्रात येऊन सांगा मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नक्कीच त्यांचा कौल उद्धव ठाकरे मानतील. पण ते भाजपचे बंदी आहेत. कैदी आहेत. त्यांनी काय बोलायचं? काय ठरवायचं? हे ते ठरवत नाही. भाजप ठरवत आहे, असंही ते म्हणाले. ज्या गोष्टी बसून बोलता आल्या असत्या, चर्चा करता आली असती. पण ते आले नाही. अडीच वर्ष सत्तेचे फायदे घेतले. तेव्हा का टोचणी लागली नाही? आसाममधून काही बोलायचं आहे. सुरतमधून काही बोलायचं हे बरोबर नाही. इथे बोलावं, असंही ते म्हणाले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें