एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर यूपीएने बोलावलेली बैठक रद्द

एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर यूपीएने बोलावलेली बैठक रद्द


नवी दिल्ली : एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर विरोधी पक्षांनी रणनीती बदलली आहे. सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीएची सत्ता येत असल्याचं दाखवण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर यूपीएने बोलावलेली मंगळवारची बैठक स्थगित करण्यात आली आहे. औपचारिक पद्धतीने काही नेते भेट घेऊ शकतात, पण 23 मे रोजी निकाल आल्यानंतरच काय ते ठरवलं जाणार आहे. त्रिशंकू परिस्थिती झाल्यास 23 मेनंतर तिसऱ्या आघाडीचीही जुळवाजुळव होऊ शकते.

सध्या दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सक्रिय झाले आहेत. शरद पवार पुन्हा एकदा दिल्लीला जाणार आहेत. सपा आणि बसपाने विरोधकांसोबत असल्याचं तर म्हटलंय. पण यूपीएला पाठिंबा देण्याबाबत अजून वाच्यता केली नाही. तर दुसरीकडे चंद्राबाबू विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका करण्यात व्यस्त आहेत.

मोदींविरोधात मोर्चेबांधणी, चंद्राबाबूंचीच आंध्र प्रदेशातली सत्ता धोक्यात?

गेल्या तीन दिवसात चंद्राबाबूंनी सीताराम येचुरी, डी राडा, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव आणि आज ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. शरद पवार यांनीही वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी आणि बीजेडीचे प्रमुख नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली आहे. ओदिशामध्ये बीजेडीला चांगल्या जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर आंध्र प्रदेशातही वाएसआर चांगल्या जागा मिळवणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसतंय.

विविध एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांचं चित्र कसं असेल?

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे देखील तिसऱ्या मोर्चाच्या प्रयत्नात आहेत. एनडीएला कमी जागा आल्या आणि यूपीएला पक्षांची जुळवाजुळव करता आली नाही, तर तिसऱ्या मोर्चासाठी प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात. उत्तर प्रदेशात चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या सपा आणि बसपाविषयी सस्पेन्स कायम आहे. कारण, मायावती आणि अखिलेश यादव यांची पुन्हा एकदा बैठक झाली.

VIDEO :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI