विविध एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांचं चित्र कसं असेल?

मुंबई : विविध एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येताना दिसत आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या जागा कमी होत आहेत. विविध एक्झिट पोलच्या सरासरीनुसार महाराष्ट्रातील 48 जागांचं चित्र कसं असेल याचं मतदारसंघनिहाय विश्लेषण टीव्ही 9 मराठीने केलंय. यामध्ये युतीच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होताना दिसत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढणार …

विविध एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रातील 48 जागांचं चित्र कसं असेल?

मुंबई : विविध एक्झिट पोलनुसार केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येताना दिसत आहे. तर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या जागा कमी होत आहेत. विविध एक्झिट पोलच्या सरासरीनुसार महाराष्ट्रातील 48 जागांचं चित्र कसं असेल याचं मतदारसंघनिहाय विश्लेषण टीव्ही 9 मराठीने केलंय. यामध्ये युतीच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा कमी होताना दिसत आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाढणार आहेत. वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळालेली या आकड्यांमधून दिसत नाही.

मतदारसंघनिहाय संभाव्य विजयी उमेदवार

बीड : डॉ. प्रीतम मुंडे, भाजप

उस्मानाबाद : राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी

लातूर : तुकाराम शृंगारे, भाजप

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस

माढा : संजय शिंदे, राष्ट्रवादी

सांगली : विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना

सातारा : उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग : विनायक राऊत, शिवसेना

कोल्हापूर : धनंजय महाडिक, राष्ट्रवादी

हातकणंगले : राजू शेट्टी, स्वाभिमानी शे. सं.

गडचिरोली : नामदेव उसेंडी, काँग्रेस

नंदुरबार : के. सी. पाडवी, काँग्रेस

धुळे : सुभाष भामरे, भाजप

जळगाव : उन्मेश पाटील, भाजप

रावेर : रक्षा खडसे, भाजप

अकोला : संजय धोत्रे, भाजप

दिंडोरी : धनराज महाले, राष्ट्रवादी

नाशिक : हेमंत गोडसे, शिवसेना

अहमदनगर : सुजय विखे, भाजप

शिर्डी : सदाशिव लोखंडे, शिवसेना

परभणी : संजय जाधव, शिवसेना

पालघर : राजेंद्र गावित, शिवसेना

नागपूर : नितीन गडकरी, भाजप

चंद्रपूर : हंसराज अहिर, भाजप

वाशिम-यवतमाळ : भावना गवळी, शिवसेना

बुलडाणा : प्रतापराव पाटील, शिवसेना

अमरावती : नवनीत कौर राणा, आघाडी

वर्धा : रामदास तडस, भाजप

रामटेक : कृपाल तुमाने, शिवसेना

भंडारा-गोंदिया : नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी

नांदेड : अशोक चव्हाण, काँग्रेस

हिंगोली : सुभाष वानखेडे, काँग्रेस

जालना : रावसाहेब दानवे, भाजप

औरंगाबाद : चंद्रकांत खैरे, शिवसेना

पुणे : गिरीश बापट, भाजप

भिवंडी : कपिल पाटील, भाजप

कल्याण : श्रीकांत शिंदे, शिवसेना

ठाणे : राजन विचारे, शिवसेना

उत्तर पश्चिम मुंबई : गजानन किर्तीकर, शिवसेना

मुंबई उत्तर पूर्व : मनोज कोटक, भाजप

मुंबई उत्तर मध्य : प्रिया दत्त, काँग्रेस

मुंबई दक्षिण मध्य : राहुल शेवाळे, शिवसेना

मुंबई दक्षिण : अरविंद सावंत, शिवसेना

उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी, भाजप

बारामती : सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी

शिरुर : अमोल कोल्हे, राष्ट्रवादी

मावळ : पार्थ पवार, राष्ट्रवादी

रायगड : सुनील तटकरे, राष्ट्रवादी

टीव्ही 9 आणि सी-व्होटरचा महाराष्ट्रातील एक्झिट पोल

शिवसेना – 15

भाजप – 19

राष्ट्रवादी – 06

काँग्रेस – 08

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *