AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे जोडे मारले, तर कुठे धोतर जाळलं, राज्यपालांच्या विरोधात चांद्यापासून बांद्यापर्यंत ‘चले जाव’चा नारा

पुण्यात युवक काँग्रेसने राज्यपालांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कुठे जोडे मारले, तर कुठे धोतर जाळलं, राज्यपालांच्या विरोधात चांद्यापासून बांद्यापर्यंत 'चले जाव'चा नारा
कुठे जोडे मारले, तर कुठे धोतर जाळलं, राज्यपालांच्या विरोधात चांद्यापासून बांद्यापर्यंत 'चले जाव'चा नाराImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2022 | 12:45 PM
Share

मुंबई: सातत्याने वादग्रस्त विधान करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांचं आणखी एक विधान भोवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची थेट विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तुलना करणं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना चांगलंच महागात पडलं आहे. राज्यपालांच्या या विधानाच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र पडसाद उमटत आहेत. राजकीय पक्षांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत सर्वच वर्गातील लोकांनी रस्त्यावर उतरून राज्यपालांच्या विधानवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांचा निषेध म्हणून कुठे प्रतिकात्मक धोतर जाळलं जात आहे, तर कुठे त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. तर कुठे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला जात आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत हेच चित्रं दिसत आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर मपवईतील गॅलरीया मॉल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उग्र निदर्शने केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वारंवार अशा प्रकारचे वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला विनंती करून या राज्यपालांची बदली इतर राज्यात करावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

सोलापुरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीने छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून कोश्यारिंचा निषेध नोंदवला. यावेळी राज्यपाल चले जावच्या घोषणाही देण्यात आल्या.

राज्यपाल हे सातत्याने राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांचा निषेध करत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी व्यक्त केली.

पुण्यात युवक काँग्रेसने राज्यपालांच्या विरोधात जोरदार आंदोलन केलं. पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी कोश्यारींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यपालांचा फोटो असलेलं बॅनरही आंदोलकांनी जाळलं. यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

नाशिकमध्ये शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त केला. यावेळी शिवप्रेमींनी प्रतिकात्मक धोतर जाळून कोश्यारी यांचा निषेध नोंदवला. धोतर जाळतानाच कोश्यारी यांच्या फोटोला जोडेही मारणअयात आले. नाशिकच्या सातपूर परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.

कोल्हापुरातील शिवाजी चौकातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे राज्यपालांच्या विरोधात प्रचंड निदर्शने केली. यावेळी राज्यपालांचा फोटो असणाऱ्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाने जोरदार आंदोलन केलं. शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत निदर्शने केली. एकाचवेळी शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.