खेकडा सावंत गद्दार.. म्हणत उस्मानाबादेत तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक, समर्थकांकडून प्रत्युत्तरासाठी शुद्धी!

तानाजी सावंत समर्थकांनीही शिवसैनिकांना इशारा दिला आहे. आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत, एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जसाच तसें उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावे असे आवाहन व इशारा सावंत यांनी दिला आहे.

खेकडा सावंत गद्दार.. म्हणत उस्मानाबादेत तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक, समर्थकांकडून प्रत्युत्तरासाठी शुद्धी!
Image Credit source: tv9 marathi
संतोष जाधव

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Jun 25, 2022 | 5:45 PM

उस्मानाबादः आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात उस्मानाबादेतसुद्धा तीव्र निदर्शनं पहायला मिळाली. उस्मानाबादमध्ये (Osmanabad) शिवसैनिकांनी सावंतांविरोधात आक्रमक आंदोलन केलं. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा उपनेते आमदार  तानाजी सावंत यांच्या उस्मानाबाद येथील संपर्क कार्यालयासमोर शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत आंदोलन (Shivsena Protest) केले. त्यांच्या कार्यालयाला काळे फासले. सावंत यांच्या विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यात रोष वाढलेला दिसून आला.. सावंत यांचा मतदार संघ असलेल्या परंडा येथे शिवसैनिकांनी जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यांना गद्दार म्हणत यांच्या फोटोला काळे फासले गेले.  चपलेने जोडे मारले व  जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. उस्मानाबादेत तानाजी सावंत यांच्या विरोधातील एक गट आहे तर सावंत समर्थकांचाही एक गट आहे. आज सावंतांविरोधात आंदोलन होत असताना समर्थकांकडूनही त्याच ताकतीचं प्रत्युत्तर देण्यात आलं.

सावंत समर्थकांचंही जोरदार प्रत्युत्तर

उस्मानावाद येथे शिवसेनेत 2 गट पडले असून शिवसैनिकांनी आमदार सावंत यांच्या संपर्क कार्यालयावर हल्लाबोल करीत काळे फसल्यानंतर सावंत समर्थकांचा गट आक्रमक झाला आहे. शिवसैनिकांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून सावंत समर्थकांनी सावंत यांच्या उस्मानाबाद संपर्क कार्यालयाचे शुद्धीकरण करीत खेकडा सावंत गद्दार असे काळे लिहलेले खोडून काढले . शिवसेना आमचीच आहे. आम्ही आजही शिवसेनेत आहोत. मात्र सावंत विरोधी आंदोलनाच्या पाठीमागे कोण यांची जाणीव आहे. त्या लोकांना योग्य वेळी उत्तर देऊ असा इशारा तानाजी सावंतांचे समर्थक सुरज साळुंके यांनी दिला आहे.

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवू’

उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात येथील शिवसेना वाढवून दाखवू आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवू असा इशारा शिवसैनिकांनी यावेळी दिला.

औकातीत रहा.. सावंतांचा इशारा

दरम्यान, तानाजी सावंत समर्थकांनीही शिवसैनिकांना इशारा दिला आहे. आमचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत, एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जसाच तसें उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावे असे आवाहन व इशारा सावंत यांनी दिला आहे. डॉ सावंत यांचे उस्मानाबाद येथील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल करीत आंदोलन केले तर पुणे येथील कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले. त्यानंतर सावंत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वरील प्रतिक्रिया दिली.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें