बोला ! पनवती कोण?; पाकिस्तानी क्रिकेटपटूने काँग्रेसला डिवचले
चारही राज्यांचे कल समोर आले आहेत. या कलानुसार चारपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येताना दिसत आहे. तर काँग्रेसची एका राज्यात सत्ता येताना दिसत आहे. मात्र, काँग्रेसच्या हातून राजस्थान सारखं मोठं राज्य निसटताना दिसत आहे. या तिन्ही राज्यात भाजपला प्रचंड जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
कराची | 3 डिसेंबर 2023 : चार राज्यांचे कल हाती आले आहेत. या चार राज्यापैंकी तीन राज्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर एका राज्यात काँग्रेसची सत्ता आली आहे. मात्र, सत्ता असलेलं राजस्थान काँग्रेसच्या हातून निसटलं आहे. आजच्या या निकालानंतर काँग्रेसमध्ये शुकशुकाट पसरला आहे. या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. या विजयावर थेट पाकिस्तानमधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने तर थेट काँग्रेसलाच घेरलं आहे. या खेळाडूने काँग्रेसला डिवचणारं ट्विट केलं आहे.
वर्ल्ड कप झाल्यानंतर पनवती हा शब्द अचानक ट्रेंडमध्ये आला होता. त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या एका रॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पनवती शब्द उच्चारून अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. आता चार राज्याचे निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा पनवती हा शब्द चर्चेत आला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पनवती कोण? असा सवाल केला आहे. दानिश कनेरियाने ट्विट करून हा सवाल केला आहे.
लोकही म्हणतात, पनवती कोण?
दरम्यान, चार राज्यांच्या निकालानंतर जनतेतूनही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. पनवती कोण? असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे. सोशल मीडियातून नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत असून राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना दिसत आहे.
पनवती पुन्हा ट्रेंड
चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर पुन्हा एकदा पनवती हा शब्द ट्रेंड झाला आहे. #राहुल_गाँधी_पनौती_है, मोदी मैजिक, Ladli Behnas, टाटा बाय… आदी शब्द ट्रेंड करताना दिसत आहेत. तसेच सोशल मीडियावर अनेक मीम्सही व्हायरल होताना दिसत आहेत.
काय आहे कल?
चार राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा कल समोर आला आहे. या कलानुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला 70 तर भाजपला 113 जागा मिळताना दिसत आहेत. मध्यप्रदेशात भाजपला 161 आणि काँग्रेसला 66 जागा मिळताना दिसत आहे. छत्तीसगडमध्ये भाजपला 55 आणि काँग्रेसला 32 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच तेलंगणात काँग्रेसला 63 आणि भाजपला 8 जागा मिळताना दिसत आहेत.
Panauti kaun? 😂
— Danish Kaneria (@DanishKaneria61) December 3, 2023