5 State Assembly Election Final Result 2023 : मिझोरममध्ये सत्ताबदल निश्चित, ZPM आघाडीवर

| Updated on: Dec 05, 2023 | 10:38 AM

Telangana, Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh and Mizoram Election Results 2023 Full Coverage in Marathi - रविवारी झालेल्या मतमोजणीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली. तेलंगणात बीआरएसची सत्ता गेली. याठिकाणी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. आता मिझोराममध्ये कोणाचे सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल.

5 State Assembly Election Final Result 2023 : मिझोरममध्ये सत्ताबदल निश्चित, ZPM आघाडीवर

मुंबई | ३ डिसेंबर 2023 : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी पूर्ण झाली. त्यानंतर आता मिझोराम विधान परिषदेचा निकाल आज येणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मिझोराममध्ये ४० विधानसभेच्या जागा आहेत. रविवारी झालेल्या मतमोजणीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली. तेलंगणात बीआरएसची सत्ता गेली. याठिकाणी काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. आता मिझोराममध्ये कोणाचे सरकार येणार? हे आज स्पष्ट होईल.  विधानसभा निवडणुकीचे पहाण्यासाठी खाली लिंकवर क्लिक करा.

TV9 मराठी Vidhansabha Election live Coverage : https://www.tv9marathi.com/elections

TV9 मराठी यूट्यूब Live TV : https://www.youtube.com/watch?v=04y0H01GTg0

TV9 मराठी Official Live TV : https://www.tv9marathi.com/live-tv

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Dec 2023 03:22 PM (IST)

    मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम – हेमंत पाटील

    नवी दिल्ली | मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. लोकसभा अध्यक्षांनी मला भेटायला बोलवलं आहे. खासदार म्हणून मी राजीनामा दिला आहे. राजीनामा घ्यायचा की नाही हा निर्णय लोकसभा अध्यक्षांचा आहे. मराठवाड्यात अजूनही अधिकारी रेकॉर्ड देत नाहीत. काही रेकॉर्ड जीर्ण झालेलं आहे. मराठवाड्यात काही अडचण झाली आहे मात्रा एकनाथ शिंदे ते दुर करतील. मात्र आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत मी सहभागी होणार नाही. असं हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

  • 04 Dec 2023 12:55 PM (IST)

    Mizoram Elections Result 2023 : 39 जागांचे निकाल जाहीर

    आतापर्यंत 39 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. झेडपीएमने 27 जागा जिंकल्या आहेत. इतर दोन जागा वेगवेगळ्या पक्षांच्या वाट्याला गेल्या आहेत. एनएमएफने 10 जागा जिंकली असून भाजपने 2 जागा जिंकल्या आहे.

  • 04 Dec 2023 12:41 PM (IST)

    Mizoram Elections Result 2023 : निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे उमेदवार सी लालहरियातुईया यांना 1,674 मते

    निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मिझोरामचे उपमुख्यमंत्री तवान्लुइया तुईचांगमध्ये झेडपीएमचे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांच्याकडून पराभूत झाले आहेत. मिझो नॅशनल फ्रंट (MNF) च्या तवानलुइया यांना 6,079 मते मिळाली, तर झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) चे उमेदवार डब्ल्यू चुआनावामा यांना 6,988 मते मिळाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार काँग्रेसचे उमेदवार सी लालहरियातुईया यांना 1,674 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार लालहमुन्सियामी यांना केवळ 67 मते मिळाली.

  • 04 Dec 2023 12:30 PM (IST)

    Mizoram Election Result 2023 : झोरम पीपल्स मूव्हमेंट 26 जागांवर आघाडीवर

    मिझोराममध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेली झोरम पीपल्स मूव्हमेंट 26 जागांवर आघाडीवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंटला राज्यातील सत्तेतून बाहेर काढताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. जेडीपीएमचे नेतृत्व मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या लालदुहोमा यांच्या हातात आहे. सध्याचे मुख्यमंत्री आणि MNF प्रमुख झोरमथांगा त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत.

  • 04 Dec 2023 12:27 PM (IST)

    Mizoram Election Result 2023 : मिझोराममध्ये झेडपीएम 26 जागांवर आघाडीवर

    मिझोराममध्ये झेडपीएम सरकार स्थापन करत असल्याचे दिसते. त्या 26 जागांवर आघाडीवर आहेत. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट 10 जागांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळताना दिसत आहे. झोराम पीपल्स मूव्हमेंटचे नेते लालदुहोमा त्यांच्या जागेवरून आघाडीवर आहेत, तर विद्यमान मुख्यमंत्री आणि MNF प्रमुख झोरामथांगा त्यांच्या जागेवरून पिछाडीवर आहेत.

  • 04 Dec 2023 12:21 PM (IST)

    Live News : MNF ची सत्ता गमावू शकते, ZPM आघाडीवर

    झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) ने 2018 च्या मिझोराम विधानसभा निवडणुकीत 26 जागा जिंकलेल्या मिझो नॅशनल फ्रंट (MNF) चा पराभव केला आहे. 2018 मध्ये ZPM 8 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. परंतु ZPM आतापर्यंतच्या मतमोजणीत आघाडीवर आहे. त्यांना बहुमत मिळाले आहे.

  • 04 Dec 2023 11:55 AM (IST)

    Live News : मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल

    मिझोरम विधानसभा निवडणूक निकाल… झोरम पीपल movement पक्षाला जोरदार यश… 40 जागांपैकी ZPM 26 जागांवर आघाडीवर… MNF मिझोरम नॅशनल फ्रंटचे 11 जागांवर आघाडी… भाजप 2, तर काँगेस 1 जागेवर आघाडी… ZPM चाच मुख्यमंत्री होण्याची शक्यता

  • 04 Dec 2023 11:29 AM (IST)

    Live News : झेडपीएम कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू

    राज्य निवडणुकीत पक्षाने आघाडी नोंदवल्यानंतर झेडपीएम कार्यकर्ते आणि समर्थकांनी सेरछिपमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पक्षाने 2 जागा जिंकल्या असून एकूण 40 जागांपैकी 24 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Dec 2023 11:10 AM (IST)

    Live News : मिझोराममध्ये झेडपीएमला प्रचंड बहुमत

    मिझोराममध्ये झेडपीएमला प्रचंड बहुमत मिळालं असल्याची माहिती समोर येत आहे… झेडपीएम 27 जागांवर आघाडीवर आहे. तर MNF 9 जागांवर, भाजप 3 आणि कॉंग्रेस 1 जागेवर पुढे आहे.

  • 04 Dec 2023 10:57 AM (IST)

    मिझोरममध्ये ZPM ला प्रचंड बहुमत

    मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या कलानुसार विरोधी पक्ष ZPM ने सत्ताधारी MNF ची हकालपट्टी केली आहे. झेडपीएम सध्या 29 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी MNF फक्त 7 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 3 आणि काँग्रेस अवघ्या एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 04 Dec 2023 10:35 AM (IST)

    देशहितासाठी विरोधकांनी साथ दिली पाहिजे – पंतप्रधान मोदी

    संसदेचं अधिवेशन विरोधकांसाठी सुवर्णसंधी. बाहेरच्या पराभवाचा राग विरोधकांनी संसदेत काढू नये. संसदेत विधेयकांवर उत्तम चर्चा व्हावी, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 04 Dec 2023 10:31 AM (IST)

    देशाने नकारात्मकतेला नाकारलं आहे – पंतप्रधान मोदी

    तीन राज्यांतील विधानसभेचे मिकाल उत्साह वाढवणारे आहेत. देशाने नकारात्कतेला नाकारलं आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

    सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे.

  • 04 Dec 2023 10:28 AM (IST)

    मोदी आहेत म्हणून भाजप आहे, मोदी नसतील तर भाजप काहीच नाही – संजय राऊत

    मोदी आहेत म्हणून भाजप आहे, मोदी नसतील तर भाजप काहीच नाही.  मोदी लाटेमुळे भाजपने 2014 साली शिवसेनेची साथ सोडली होती. पुन्हा भाजपची लाट आली तर गद्दारांचं काय होणार ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

  • 04 Dec 2023 10:26 AM (IST)

    काँग्रेसने एमपीमध्ये छोट्या घटक पक्षांकडे दिलं नाही – संजय राऊत

    कालच्या निकालानंतर इंडिया आघाडी ताकडीने उभी राहील. राहुल गांधींनी तेलंगणात जोरदार प्रचार केला.

  • 04 Dec 2023 10:22 AM (IST)

    कालच्या ‘इव्हीएम आदेशाचा’ आम्ही स्वीकार करतो – संजय राऊत

    कालच्या ‘इव्हीएम आदेशाचा’ आम्ही स्वीकार करतो. मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निकालामुळे लोक सदम्यात आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

  • 04 Dec 2023 10:15 AM (IST)

    मिझोराममध्ये सत्ताबदल, ZPM ला बहुमत

    मिझोरममध्ये लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखालीलल झेडपीएमला बहुमत मिळालं असून सत्ताबदलाचे संकेत स्पष्ट आहेत. निवडणूक आयोगानुसार, झेडपीएम सध्या राज्यात 24 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) ला राज्यात १३ जागांवर आघाडी मिळाली आहे. भारतीय जनता पक्ष तीन तर कांग्रेस पक्षाला फक्त एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

  • 04 Dec 2023 09:59 AM (IST)

    मिझोरममधील सर्व 40 जागांचे कल समोर, ZPM ला बहुमत

    मिझोरम निवडणुकीच्या कलानुसार झेडपीएमला बहुमत मिळालं आहे. झेडपीएम 22 जागांवर पुढे तर एमएनएफ 13 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 4 जागांवर तर भाजप फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. राज्यात विधानसभेच्या 40 जागा असून बहुमतासाठी 21 जागा जिंकायच्या आहेत.

  • 04 Dec 2023 09:46 AM (IST)

    मिझोरममधील सर्व 40 जागांचे कल समोर आले

    मिझोरममधील सर्व 40 जागांचे कल समोर आले आहेत. सत्ताधारी MNF ची सुट्टी होणार असल्याचं दिसतंय. तर विरोधी पक्ष ZPM बहुमताच्या अगदी जवळ आहे. झेडपीएम 20 जागांवर पुढे आहे. तर बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहेत. MNF 13 जागांवर, काँग्रेस 6 जागांवर आणि भाजप फक्त एका जागेवर पुढे आहे.

  • 04 Dec 2023 09:31 AM (IST)

    मिझोरममध्ये सत्ताबदल, एमएनएफची होऊ शकते सुट्टी

    मिझोरम विधानसभा निवडणुकीचा सुरुवातीचा कल पाहता, विरोधी पक्ष झे़डपीएमला बहुमत मिळण्यासाठी फक्त 2 जागा कमी आहेत. विधानसभेच्या 40 जागांपैकी झेडपीएम 19 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी एमएनएफ फक्त 13 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 8 जागांवर आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 04 Dec 2023 09:15 AM (IST)

    भाजपचं खातं अद्याप उघडलेलं नाही

    मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंतचा कल पाहता भाजपने अद्याप खातं उघडलं नाही. तर काँग्रेस 6 जागांवर पुढे आहे. सत्ताधारी एमएनएफ 13 जागांवर तर विरोधी पक्ष जेडपीएम 18 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Dec 2023 08:57 AM (IST)

    कोण बाजी मारणार?

    काल चार राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. यात राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय झाला. तर तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकलं. आता आज मिझोरममध्ये मतमोजणी होत आहे. इथं कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

  • 04 Dec 2023 08:45 AM (IST)

    मिझोरममध्ये काँटे की टक्कर

    मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या 40 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत 18 जागांचा कल हाती आले आहेत.  यात MNF 6 जागांवर तर ZPM 8 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस 4 जागांवर आघाडीवर आहे.

  • 04 Dec 2023 08:30 AM (IST)

    मिझोरममध्ये मतमोजणीचा पहिला कल समोर

    मिझोरममध्ये मतमोजणीचा पहिला टप्पा पूर्ण… मतमोजणीतील पहिला कल हाती आला आहे. एका जागेवर एमएनएफ आणि भाजप एका जागेवर आघाडीवर आहे. एमएनएफ आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होत आहे. 40 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे.

  • 04 Dec 2023 08:15 AM (IST)

    मिझोरममध्ये मतमोजणीला सुरुवात

    मिझोरममध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येईल. त्यामुळे या पहिल्या कलात कोण आघाडी घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

  • 04 Dec 2023 07:58 AM (IST)

    Mizoram Election Result : १३ मतदान केंद्रावर मतमोजणी

    मिझोराममध्ये सात नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. विधानसभेच्या ४० जागांसाठी १३ मतदान केंद्रावर मतमोजणी होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व निकाल लागण्याची शक्यता आहे.

  • 04 Dec 2023 07:44 AM (IST)

    Mizoram Election Result : 2018 मध्ये एनडीएची होती सत्ता

    मिझोराममध्ये 2018 मध्ये एनडीएचा घटक पक्ष असलेल्या एमएनएफने 26 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यावेळी जेडपीएम 8 जागा घेतल्या होत्या. काँग्रेसला केवळ 5 जागांवर समाधान मानावे लागले. परंतु 2013 मध्ये 34 जागा काँग्रेसकडे होत्या.

  • 04 Dec 2023 07:28 AM (IST)

    Mizoram Election Result : आठ वाजता सुरु होणार मतमोजणी

    मिझोराम विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होणार आहे. यापूर्वी मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सुरक्षा व्यवस्थाही कठोर करण्यात आली आहे.

  • 04 Dec 2023 07:15 AM (IST)

    Mizoram Election Result : मिझोराममध्ये विजयाचे दावे

    मिझोराममधील विधानसभा निवडणुकीत जोरमथांगा आणि लालदुहोमा राज्यात दोन्ही नेत्यांनी विजयाचे दावे केले आहे. राज्यात 1984 पासून काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ)ची सरकार राहिली आहे.

  • 03 Dec 2023 08:15 PM (IST)

    भाजपच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी वाढली, कारण…- नरेंद्र मोदींनी दिला कानमंत्र

    भाजपच्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी वाढली आहे. कारण नकारात्मक शक्ती वाढणार आहे. एकत्र येतील. समाजात दरी निर्माण करणारे नवी संधी शोधतील. आपल्याला त्यांची सामना करायचा आहे. त्यांच्या फेक नरेटिव्हला उत्तर द्यायचं आहे. आपल्याला जनतेचा विश्वास वाढवायचा आहे- नरेंद्र मोदी

  • 03 Dec 2023 07:56 PM (IST)

    भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी आर्थिक ताकद- नरेंद्र मोदी

    जगात मंदीचा परिणाम भारतावर पडेल असं लोक म्हणत होते. पण भारताने चांगली कामगिरी केली आहे. आज भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी आर्थिक ताकद आहे. भारतीय लोकांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. जीएसटीचं मोठा विकास आहे. कृषी उत्पादन वाढत आहे. शेअर मार्केटवर लोकांचा विश्वास आहे. देशात गाड्यांचं उत्पादन वाढत आहे. वीज उत्पादन वाढत आहे. जगभरातील कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास तयार आहेत- नरेंद्र मोदी

  • 03 Dec 2023 07:45 PM (IST)

    नरेंद्र मोदींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांचं कौतुक

    मी प्रत्येक राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याचं कौतुक, पूर्ण प्रशंसा करतो. भाजप आणि कमळाबाबतची तुमची निष्ठा, तुमचं समर्पण अतुलनीय आहे. डबल इंजिन सरकारचा मेसेज तुम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवला, त्याचा फायदा आज होत आहे- नरेंद्र मोदी

  • 03 Dec 2023 07:37 PM (IST)

    आदिवासींच्या जागेवर काँग्रेसचा सुपडा साफ झाला- नरेंद्र मोदी

    काँग्रेसने कधी आदिवासींना विचारलं नाही त्यांनी काँग्रेसचा सफाया केला. हीच भावना आम्ही एमपी, छत्तीसगड आणि राजस्थानातही पाहिली. या राज्यातील आदिवासींच्या जागेवर काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.

  • 03 Dec 2023 07:28 PM (IST)

    ज्या सरकारने युवांविरोधात काम केलंय ते कायम बाहेर गेलंय- नरेंद्र मोदी

    आजच्या विजयाने नवा महिलांमध्ये विश्वास निर्माण झालाय. कारण आजच्या विजयात प्रत्येक महिला आपला विजय बघत आहे. ज्या सरकारने युवांविरोधात काम केलंय ते कायम बाहेर गेल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

  • 03 Dec 2023 07:22 PM (IST)

    ही निवडणूक प्रत्येक आदिवासी, शेतकरी जिंकला आहे- मोदी

    भाजपच्या  विजयाने माझी जबाबदारी वाढत आहे. विकसित भारताच्या जनतेचा विजय झाला आहे. काही जणांना देशाला जातीमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला. आज प्रत्येक गरिबाच्या मनात जिंकल्याची भावना आहे- नरेंद्र मोदी

  • 03 Dec 2023 07:19 PM (IST)

    आज आत्मनिर्भर भारताचा विजय झालाय- नरेंद्र मोदी

    आजचा दिवस ऐतिहासिक, आपला आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे.  आज आत्मनिर्भर  भारताचा विजय झालाय. सर्व मतदारांना आदरपूर्वक नमन- नरेंद्र मोदी

  • 03 Dec 2023 07:09 PM (IST)

    प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोटा वाटा- जे. पी. नड्डा

    प्रचारापासून ते निकालापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बारीक लक्ष असतं. प्रत्येक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोटा वाटा असतो. देशातील प्रत्येक घटकाला मोदी पुढे आणू शकतात. देशाला फक्त एकच खात्री ती म्हणजे मोदींची गॅरंटी, इंडिया आघाडीने देशात जातीवादाचं राजकारण केल्याचं जे. पी. नड्डा म्हणाले.

  • 03 Dec 2023 07:05 PM (IST)

    भाजपच्या मुख्यालयात पीएम मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा दाखल

    तीन राज्यांमध्ये निवडणुकीत बाजी मारल्यानंतर भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी उपस्थिती लावली आहे.  मुख्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

  • 03 Dec 2023 06:42 PM (IST)

    नागपूरमधील बडकस चौकात फडणवीसांच्या उपस्थितीत सेलिब्रेशन

    राज्यामधील निवडणुकांच्या निकालानंतर नागपूरमधील बडकस चौकात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. भाजप नेते देंवेंद्र फडणवीस आता पोहोचले आहेत.

  • 03 Dec 2023 06:08 PM (IST)

    …तोपर्यंत EVM यंत्रणेला दोष देता येणार नाही- शरद पवार

    EVM बाबतची खरी माहिती समोर येत नाही तोपर्यंत यंत्रणेला दोष देता येणार नाही- शरद पवार

  • 03 Dec 2023 05:33 PM (IST)

    देशभर पदयात्रा काढून राहुल गांधीच्या पदरात काहीच पडलं नाही- संजय गायकवाड

    देशात मोदी साहेबांचा करिष्मा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. देशभर पदयात्रा काढून राहुल गांधीच्या पदरात काहीच पडलं नाही- संजय गायकवाड

  • 03 Dec 2023 04:32 PM (IST)

    नेमकी पनवती कोण काँग्रेसला लक्षात आलं असेल- देवेंद्र फडणवीस

    भाजपचा प्राण फक्त मोदीजी, आम्हाला यश मिळालं की ईडी, सीबीआय आणि ईव्हीएम असे आरोप विरोधक करतात. नेमकी पनवती कोण काँग्रेसला लक्षात आलं असेल. छत्तीसगडमध्ये ओबीसी आणि आदिवासी समाज हा भाजपसोबत आहे. लोकसभेतही अभुतपूर्व विजय मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 03 Dec 2023 04:20 PM (IST)

    छत्तीसगडचा निकाल धक्कादायक- संजय राऊत

    पाच पैकी चार राज्यांचे आज निकाल लागलेत. तेलंगणात काँग्रेसने जिंकलं हे अनपेक्षितपणे आहे. तेलंगणामध्ये MIM केसीआर फॅक्टर चालला नाही. राहुल गांधी प्रियांका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. राजस्थान मध्ये दर पाच वर्षांनी नवीन सरकार येतं. छत्तीसगडचा निकाल धक्कादायक आहे. अशोक गेहलोत यांनी चांगलं काम केलं. पण मतदारांनी तिथे मतदारांनी सरकार बदलण्याची परंपरा कायम ठेवल्याचं संजय राऊत म्हणाले.

  • 03 Dec 2023 03:21 PM (IST)

    मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास- विनोद तावडे

    आजच्या निकालाच विश्लेषण म्हणजे मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास. मोदींमुळे विजय मिळाला आहे. राहुल गांधींच्या यात्रेचं काय परिणाम झाला. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक वेगवेगळी असते. राजस्थानमध्ये दलित महिलेवर अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला- विनोद तावडे

  • 03 Dec 2023 02:34 PM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थानमधील भाजपचा आश्वासक चेहरा वसुंधरा राजे विजयी

    राजस्थानच्या झालारपाट मतदार संघातून भाजपच्या वसुंधरा राजे विजयी झाल्या आहेत. ५३ हजार १९३ मते मिळवून त्यांनी काँग्रेसचे रामलाल चौहान यांचा पराभव केला.

  • 03 Dec 2023 02:23 PM (IST)

    Madhya Pradesh Election Results 2023 : फूलों का तारों का… शिवराज सिंह चौहान यांच्यावर फुलांची उधळण

    मध्य प्रदेशच्या विजयात महत्वाचा वाट असणारे आणि राज्यातील महिलांमध्ये लोकप्रिय असणारे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे अभिनंदन करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महिलांनी आनंद व्यक्त करत फूलों का तारों का या गाण्यावर ताल धरत शिवराज सिंह चौहान यांच्यावर फुलांची उधळण केली

  • 03 Dec 2023 02:14 PM (IST)

    Telagna Election Results 2023 : ‘सीएम-सीएम’ रेवंत रेड्डी यांच्या बाजूने काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

    तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हैदराबादमधील पक्ष कार्यालयात एकच गर्दी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी ‘सीएम-सीएम’ अशा घोषणा दिल्या. राज्यात एकूण 119 जागांपैकी 63 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. तर, सत्ताधारी BRS 41 जागांवर आणि भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 02:07 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवतात.

    बेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना, अशी टीका करत होते. केंद्र आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. घरात बसणाऱ्याना लोक नाकारतात, मत देत नाहीत. घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवतात. जनतेमध्ये जाऊन काम करतात त्यांना समर्थन मिळते. काम करणाऱ्यांना लोक मत देतात. आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला लोक नाकारतील, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

  • 03 Dec 2023 01:56 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : मन, मन में मोदी असा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    याआधी घर घर मी मोदी असे म्हणत होते पण, या निवडणूक निकालामुळे मन, मन में मोदी असा निकाल या चार राज्याच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला. मोदी यांचा करिष्मा संपला असे म्हणत होते. पण, निकाल जनतेच्या हातात असतात अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारत तोडो असा प्रचार केला. त्यांना जनतेने धडा शिकविला. अशी टीकाही त्यांनी केली.

  • 03 Dec 2023 01:52 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : महाराष्ट्रातही हेच दिसून येईल, महायुती जिंकणार : चंद्रशेखर बावनकुळे

    मोदिजीनी भारत बाल्स्थानी व्हावा यासाठी जे काही निर्णय घेतले त्यावर जनतेने शिक्कामोर्तब केले. मध्यप्रदेश आदिवासी, ओबीसी जनतेने विश्वास दाखविला. राजस्थान आणि छत्तीसगड येथेही जनतेने अभिंनद केले. महाराष्ट्रातही हेच वातावरण आहे. महायुतीच्या 45 तर विधानसभेत २४५ जागा निवडून येतील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

  • 03 Dec 2023 01:42 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : भाजप फक्त राम मंदिरचा प्रश्न मांडला नाही तर सोबत विकासही केला, शिंदे गटाच्या नेत्यांचे मोठे विधान

    ही निवडणुक म्हणजे सेमी फायनल होती. इंडिया आघाडी बैठक करून काय साध्य झालं नाही. इंडिया आघाडी टिकणार नाही हे आता सिद्ध झालेलं आहे. कॉंग्रसची सत्ता ही अनेक वर्षापासून होती. त्या तुलनेत आजचा विकास भाजप सरकार काळात झाला. लोकांना आता इमोशनल करून मत मिळत नाही तर विकास करून मिळतो. हे फक्त भाजप जातीवाद करते असा आरोप करतात. पण, भाजपने फक्त राम मंदिरचा प्रश्न मांडत नाही तर सोबत विकासही केला अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दिली.

  • 03 Dec 2023 01:31 PM (IST)

    Telagna Election Results 2023 : मोठी बातमी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर मत मोजणीमध्ये पिछाडीवर

    तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे मत मोजणीमध्ये पिछाडीवर गेले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंती रेड्डी हे केसीआर यांच्याविरोधात लढत आहेत. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेस उमेदवार आणि प्रदेशाध्यक्ष ए रेवंत रेड्डी हे कामारेड्डीमध्ये 2,585 मतांनी आघाडीवर आहेत.

  • 03 Dec 2023 01:21 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : शरद पवार यांची मोठी प्रतिक्रिया, यापेक्षा वेगळा निकाल लागेल अशी…

    जे काही निकाल येत आहेत हेत ते 6 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. यापेक्षा वेगळा निकाल लागेल अशी माहिती आमच्याकडे नव्हती असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. राजस्थानमध्ये नव्या लोकांना संधी द्यावी असा जनतेचा मूड होता. तर, बीआरएसचे स्वतःच्या राज्याकडे दुर्लक्ष झाले असे ते म्हणाले.

  • 03 Dec 2023 01:03 PM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थान मध्ये भाजपला धक्का, 7 पैकी 4 खासदार पिछाडीवर

    राजस्थानमध्ये भाजपचे 7 पैकी 4 खासदार पिछाडीवर आहेत. झोटवाड़ा येथून राज्यवर्धन राठौड़, किशनगढ़ येथून भागीरथ चौधरी, सांचोर येथून देवजी पटेल आणि मंडावा मधून नरेंद्र कुमार हे खासदार पिछाडीवर आहेत.

  • 03 Dec 2023 12:54 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे, शिवसेना नेत्यांचा सल्ला

    काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मात्र, तेलंगणात राहुल गांधी यांच्या यात्रेचा परिणाम पाहायला मिळाला. २०२४ ला इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात येईल. भाजपने राजस्थानमध्ये चेहरा नसतानाही निवडणुकीत यश मिळवलं. वसुंधरा राजे यांना भाजपने बाजूला केलं होतं. मात्र, येत्या काळात केंद्रात चित्र बदललेलं पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार (ठाकरे गट ) प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलीय.

  • 03 Dec 2023 12:44 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : तीन मोठ्या राज्यांनी ठरवला लोकसभेचा मूड

    मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन मोठ्या राज्यांमध्ये भाजपने सत्तेसाठी लागणाऱ्या बहुमताचा आकडा पार केलाय असे आताचा कल सांगत आहे. कॉंग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये प्रचंड तफावत आहे. त्यामुळे या तीन मोठ्या राज्यांच्या जनतेने लोकसभा निवडणुकांचा कल ठरविला आहे. कॉंग्रेसला नाकारत जनतेने भाजपच्या हाती सत्ता देण्याचा निर्णय घेतला असे दिसून येत आहे.

  • 03 Dec 2023 12:38 PM (IST)

    Madhya Pradesh Election Results 2023 : केंद्रीय मंत्री नरेद्र सिंह तोमर पिछाडीवर

    मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुक लढविणारे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे पिछाडीवर आहेत. दिमानी विधानसभा मतदार संघातून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर निवडणूक लढवीत आहेत. या जागेवर सर्वांचे लक्ष लागले होते. दिमानी ही जागा काँग्रेसची पारंपारिक जागा मानली जाते.

  • 03 Dec 2023 12:27 PM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थानमध्ये सातही खासदार पिछाडीवर, भाजपला धक्का

    राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने सात विद्यमान खासदार निवडणुक लढवीत होते. ही भाजपने मोठी खेळी खेळली होती. मात्र, हे सातही खासदार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत. हा भाजपला धक्का मानला जात आहे.

  • 03 Dec 2023 12:24 PM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी यांनी केले भाजपच्या विजयाबद्दल अभिनंदन

    तीन राज्यात भाजपला यश मिळत आहे. या विजयाबद्दल अनेकांचे अभिनंदन अशी प्रतिक्रिया खासदार अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिली आहे. चित्रपट अभिनेत्री असूनही मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. मी मथुरेतून खासदार होऊ शकेन पण माझे शरीर आणि मन इथेच जोडलेले आहे असे त्या म्हणाल्या.

  • 03 Dec 2023 11:55 AM (IST)

    महाराष्ट्र भाजपचा जल्लोष, परदेशातील जनतेलाही मोदीजी हवेत, नेत्यांच्या प्रतिक्रिया

    चार राज्यांपैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याचा महाराष्ट्र भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे. पुण्यात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विजयाचा जल्लोष केला. तर आमदार आशिष शेलार यांनी आज आम्ही तीन राज्यात जिंकलो आहोत. जनतेचा आवाज ऐकायला हवा असे म्हटले आहे. भाजप खासदार गोपाल शेट्टी यांनी भाजपला तीन राज्यात विजय मिळत आहे. तीन राज्यात भाजप पुढे आहे आणि पुढेच राहणार आहे. छत्तीसगडमध्येही भाजप येणार आहे. देशातील जनतेलाच नाही तर परदेशातील जनतेलाही मोदीजी लोकसभेत हवे आहेत असे म्हटले आहे.

  • 03 Dec 2023 11:42 AM (IST)

    Telagna Election Results 2023 : तेलंगणामध्ये कॉंग्रेसचा पहिला निकाल हाती, आदिनारायण विजयी

    चार राज्यांच्या निवडणुकांमधून तेलंगणामधील पहिला निकाल हाती आला आहे. कॉंग्रेसचे आदिनारायण हे विजयी झाले आहेत. अश्वरा पेट या मतदार संघातून ते विजयी झाले आहे. हा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी (Scheduled Tribes) राखीव होता.

  • 03 Dec 2023 11:34 AM (IST)

    Telagna and Chhattisgarh Election Results 2023 : तेलंगणा आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री पिछाडीवर, बीआरएसचे सहा मंत्री पिछाडीवर

    तेलंगणामध्ये कॉंग्रेस तर छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर आहे. पण विशेष म्हणजे या दोन्ही राज्यातील मुख्यमंत्री पिछाडीवर असल्याची माहिती हाती येत आहे. तसेच, तेलंगणामधील बीआरएसचे सहा मंत्री पराभवाच्या छायेत आहेत. बीएसआरचे मुख्यमंत्री केसीआर राव आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे पिछाडीवर आहेत अशी माहिती हाती आली आहे.

  • 03 Dec 2023 11:18 AM (IST)

    काँग्रेस हे स्वतः साठी काम करते त्याचा फटका बसला, प्रवीण दरेकर यांची टीका

    एक्झिट पोलने जे जे अंदाज दिले होते तेव्हा काही जण उथळ झाले होते. आम्ही विश्वासाने सांगितले होते की जनता भाजप आणि मोदींच्या बाजुने आहे. आज ते दिसत आहे. काँग्रेस हे स्वतः साठी काम करते. गटातटात विभागलेलं काँग्रेस आहे. त्यामुळे त्याचा फटका काँग्रेसला पडला अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

  • 03 Dec 2023 11:08 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : तेलंगणा वगळता कॉंग्रेसची मोठी पीछेहाट, मोदी यांची जादू कायम

    सकाळी आठ वाजता चार राज्यातील मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या तासाचा कल आला तेव्हा कॉंग्रेसने चारही राज्यांमध्ये मुसंडी मारल्याचे दिसत होते. मात्र, दिवस पुढे सरकत आहे त्याप्रमाणे कॉंग्रेसची तेलंगणा वगळता अन्य तीन राज्यात मोठी पीछेहाट झाल्याचे दिसत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान येथे भाजपने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. या निकालामुळे देशात मोदी नावाची जादू कायम असल्याचे दिसत आहे.

  • 03 Dec 2023 10:47 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : निवडणुकांचा कल हाती येताच मोठ्या घडामोडी सुरु

    चार राज्यांच्या विधानसभा निवडणुक मतमोजणीचा कल हाती येत आहे. आतापर्यंतच्या कलानुसार मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप आणि तेलंगणा, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. हा कल हाती येताच राजधानी दिल्लीत मोठ्या हालचालीना सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता दिल्ली मधील भाजप कार्यालयात जाणार आहेत. तर कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी नेत्यांना निमंत्रित केलं आहे. 6 डिसेंबरला इंडीया आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे.

  • 03 Dec 2023 10:37 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण, कुठे जल्लोष तर कुठे फटाक्याची आतषबाजी

    तेलंगणामध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याने काँग्रेस कार्यकर्त्याच्या उत्साहाला उधाण आले आहे. कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. हैदराबाद येथील काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते एकवटले. दुसरीकडे राजस्थानमध्ये भाजपच्या विजयाचा कल समोर येत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनीही जयपुर मुख्यालयात जमायला सुरवात केली आहे. ढोल ताशे वाजवले जात आहेत. तसेच, मुख्यालयाची झेंडे आणि फुग्यांनी सजावट करण्यात आली आहे.

  • 03 Dec 2023 10:26 AM (IST)

    Madhya Pradesh Election Results 2023 : मध्य प्रदेशमध्ये भाजपचा जल्लोष सुरु, कॉंग्रेसला अर्ध्यावरच रोखल

    मध्यप्रदेशमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपची एक आहाती सत्ता येण्याची चिन्हे आहेत. भाजपने जोरदार मुसंडी मारत कॉंग्रेसला केवळ ७२ जागांवर रोखण्यात यश मिळविले आहे. भाजपने बहुमताचा जादुई आकडा पार केला आहे. भाजप १५४ जागांवर आघाडीवर आहे. भाजप उमेदवार आघाडीवर असल्याचे कळताच कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकच जल्लोष करण्यास सुरवात केली आहे.

  • 03 Dec 2023 10:16 AM (IST)

    Telagna Election Results 2023 : तेलंगणामध्ये बसेस आल्या आणि रिकामी परत गेल्या

    तेलंगणामध्ये बीआरएस आणि कॉंग्रेसमध्ये अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. येथे अटीतटीची लढत झाल्यास काँग्रेस आमदारांना कर्नाटकमध्ये नेण्यासाठी बसेस आणल्या होत्या. मात्र, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार बनत असल्याच्या शक्यतेने या बसेस परत पाठविण्यात आल्या आहेत. दरम्यान, तेलंगणामध्ये कॉंग्रेस विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आताचा कल पाहता कॉंग्रेस ६५ जागांवर आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 10:08 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : कोण मात्तबर आघाडीवर आणि कोण पिछाडीवर?

    तेलंगणामध्ये कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आघाडीवर आहेत. तर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि कॉंग्रेस उमेदवार मोहम्मद अझरुद्दीन पिछाडीवर आहेत. मध्यप्रदेशमधून कॉंग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार कमलनाथ आघाडीवर आहेत. राजस्थानमध्ये भाजपच्या वसुंधर राजे आघाडीवर, कॉंग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर आहेत.

  • 03 Dec 2023 09:52 AM (IST)

    Telagna Election Results 2023 : तेलंगणामध्ये विजयाचा गुलाल काँग्रेसच उधळणार, माणिकराव ठाकरे

    हैद्राबाद : तेलंगणामध्ये कॉंग्रेस उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यावर तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी विजयाचा गुलाल काँग्रेसच उधळणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस 70 पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल. मुख्यमंत्री केसीआर यांनी राजेशाही असल्याप्रमाणे फार्महाऊसवरून सरकार चालवले. दहा वर्षात 10 वेळाही केसीआर मंत्रालयात आले नाहीत. दहा वर्षात कोणतेही काम केले नाही याचा जनतेमध्ये याचा रोष होता. तेच या निवडणुकांच्या माध्यमातून दिसून येत आहे असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

  • 03 Dec 2023 09:46 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये भाजप तर तेलंगणात कॉंग्रेस, छत्तीसगडमध्ये रस्सीखेच

    मध्य प्रदेशमध्ये भाजपने १२९ जगावर आघाडी घेतली आहे तर कॉंग्रेस ९५ जागांवर पुढे आहे. तेलंगणामध्ये कॉंग्रेस ६२ तर बीआरएस 47 जागांवर पुढे आहे. राजस्थानमध्येही भाजप पुढे आहे. येथे भाजपने मुसंडी मारली आहे. भाजप 107 तर कॉंग्रेस ८१ जागांवर पुढे आहे. छत्तीसगडमध्येही रस्सीखेच सुरु आहे. कॉंग्रेस ४३ तर भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 09:32 AM (IST)

    Madhya Pradesh Election Results 2023 : कॉंग्रेसला धक्का, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार पिछाडीवर

    मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसला धक्का बसत आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे परमुख दावेदार कमलनाथ हे पिछाडीवर आहेत. कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. येथून भाजपचे बंटी साहू हे कमलनाथ यांच्याविरोधात उभे आहेत.

  • 03 Dec 2023 09:22 AM (IST)

    Madhya Pradesh and Rajasthan Election Results 2023 : मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये कुणाचे ‘राज’? चौहान, कमलनाथ, गेलहोत की राजे?

    मध्यप्रदेश निवडणुकीत मतमोजणी दरम्यान पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. आघाडीवर असलेल्या कॉंग्रेसवर मात करून भाजपने येथे आघाडी घेतली आहे. भाजप 113 जागांवर आघाडीवर आहे तर कॉंग्रेसची घौडदौड ९५ जागांवर थांबली आहे. राजस्थानमध्ये कॉंग्रेस ९७ जागांवर स्थिरावली आहे. तर, भाजप ९४ जागावर आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 09:12 AM (IST)

    4 State Assembly Election Results 2023 : राहुल गांधी यांना जनतेची पसंती? कॉंग्रेस चार कदम पुढे

    आतापर्यतचा कल पाहता चारही विधानसभा निवडणुकाच्या मत मोजणीमध्ये कॉंग्रेस चार कदम पुढे आल्याचे दिसून येत आहे. तेलंगणामध्ये कॉंग्रेस 60 जागांवर, मध्य प्रदेशमध्ये 106, राजस्थानमध्ये ९६ तर छत्तीसगडमध्ये ९८ जागांवर आघाडीवर आहे. एकूणच कल पाहता मतदारांनी राहुल गांधी यांना पसंती दिल्याचे दिसून येत आहे.

  • 03 Dec 2023 09:00 AM (IST)

    Telagna Election Results 2023 : तेलंगणामध्ये कॉंग्रेस सत्तेजवळ, बीआरएसही शर्यतीत कायम

    तेलंगणामध्ये सध्या सुरु असलेया मतमोजणीच्या आधारे कॉंग्रेस सत्तेच्या जवळपास असल्याचे दिसून येत आहे. कॉंग्रेसचे 59 उमदेवार आघाडीवर आहेत तर सत्ताधारी बीआरएसही शर्यतीत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. बीआरएसचे ३३ उमेदवार आघाडीवर आहेत. येथे 119 जागांसाठी निवडणूक होत आहे.

  • 03 Dec 2023 08:49 AM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थानमध्ये कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट आघाडीवर

    राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे आघाडीवर असल्याची बातमी समोर येत आहे. टोंक विधानसभेसाठी काँग्रेसचे सचिन पायलट आणि भाजपचे अजित सिंह यांच्यात लढत होत आहे.

  • 03 Dec 2023 08:38 AM (IST)

    Rajasthan Election Results 2023 : राजस्थानमध्ये तुल्यबळ लढत, अन्य पक्षांनी वाढविली चिंता

    राजस्थानमध्ये कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसत आहे. कॉंग्रेसचे ६१ तर भाजपचे 70 उमेदवार आघाडीवर आहेत. या तुलनेत अपक्ष उमेदवारांनी येथे बाजी मारली आहे. तब्बल १२ अन्य पक्षांचे उमेदवार येथे आघाडीवर आहेत. त्यामुळे सत्ताधारी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे.

  • 03 Dec 2023 08:33 AM (IST)

    Chhattisgarh Election Results 2023 : छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची आघाडी, भाजपवर मात

    छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजप मात्र काहीशा पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. कॉंग्रसचे २५ उमदेवार आघाडीवर आहेत. येथे कॉंग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत रंगली आहे.

  • 03 Dec 2023 08:27 AM (IST)

    Telagna Election Results 2023 : तेलंगणामध्ये बीआरएसची घौडदौड सुरु, कॉंग्रेसही आघाडीवर

    तेलंगणामध्ये कॉंग्रेस आणि बीआरएसमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. येथे बीआरएसचे 20 तर कॉंग्रेसचे २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर, एमआयएमचा 1 उमेदवार आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 08:22 AM (IST)

    Madhya Pradesh Election Results 2023 : मध्यप्रदेश मध्ये कॉंग्रेस आघाडीवर, भाजपची धाकधूक वाढली

    मध्य प्रदेश राज्यामध्ये कॉंग्रेसने आघाडी घेतली आहे. कॉंग्रेसचे ५० उमेदवार आघाडीवर आहे. तर, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे.

  • 03 Dec 2023 08:09 AM (IST)

    निकाल जाहीर होण्यापूर्वी राजस्थान कॉंग्रेसने दिल्या उमेदवारांना सूचना

    निवडणूक आयोगाने पोस्टल मतमोजणीस सुरवात केली आहे. अंतिम निकाल हाती येण्यास अवघे काही तास उरले आहेत. त्यापूर्वी राजस्थान काँग्रेस पक्षाने उमेदवारांसाठी सूचना जारी केल्याची माहिती मिळत आहे. सर्व विजयी उमेदवारांनी सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जयपूरला पोहोचावे, असे निर्देश कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी उमेदवारांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर कॉंग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

  • 03 Dec 2023 08:06 AM (IST)

    राजस्थानचा पहिला कल हाती, मध्यप्रदेशमध्ये कॉंग्रेस आणि भाजप तीन जागांवर आघाडीवर, काटे की टक्कर…

    चार राज्यांमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरवात झाली आहे. राजस्थानमध्ये भाजप दोन जागांवर आघाडीवर आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि कॉंग्रेस तीन तीन जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणामध्ये बीआरएस एका जागेवर आघाडीवर आहे.

  • 03 Dec 2023 07:58 AM (IST)

    भाजप म्हणजे देशातील शहरे आणि रस्त्यांची नावे बदलणारा कारखाना, सामनामधून भाजपवर टीका

    मुंबई : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागतील. संध्याकाळपर्यंत पाच राज्ये ‘2024’ चे देशाचे भविष्य ठरवतील. तेलंगणाचे मतदान सगळ्यात शेवटी म्हणजे 30 तारखेला झाले. तेलंगणात भाजप कोठेच नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हैदराबादेत प्रचारास गेले. त्यांनी जाहीर केले की, तेलंगणात आमचे सरकार आले तर हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करू. हैदराबादचे ‘भाग्यनगर’ केल्याने देशाचे आणि जनतेचे कोणते प्रश्न सुटणार? भाजप म्हणजे देशातील शहरे आणि रस्त्यांची नावे बदलणारा कारखाना झाला आहे, अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे.

  • 03 Dec 2023 07:51 AM (IST)

    चार मुख्यमंत्र्यांचे भवितव्य पणाला, कुणाची खुर्ची वाचणार? कुणाची जाणार?

    मुंबई : केसी राव (तेलंगणा), शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश), अशोक गहलोत (राजस्थान), भूपेश बघेल (छत्तीसगड) या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्याचे भवितव्य पणाला लागले आहे. कुणाची खुर्ची वाचणार? कुणाची जाणार? याचा फैसला अवघ्या काही तासात होणार आहे. निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होत आहे.

  • 03 Dec 2023 07:31 AM (IST)

    मतमोजणी अर्ध्या तासावर येऊन पोहोचली, तेलंगणामध्ये बीआरएस आणि कॉंग्रेस यांच्यात चुरशीची लढत

    मुंबई : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी अवघ्या अर्ध्या तासावर येवून पोहोचली आहे. चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी अवघ्या अर्ध्या तासावर येवून पोहोचली आहे. तेलंगणामध्ये बीआरएस आणि कॉंग्रेस यांच्यात चुरशीची लढत होत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेलहोत पुन्हा सत्ता राखणार का याचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.

Published On - Dec 03,2023 7:13 AM

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.