अजितदादा आणि जयंत पाटलांच्या सभेत भगीरथ भालके समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची धुलाई

विद्यार्थी सेवक किरण घोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून भालके कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याची मागणी केली होती. | Pandharpur constituency bypoll

अजितदादा आणि जयंत पाटलांच्या सभेत भगीरथ भालके समर्थकांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची धुलाई
पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे

पंढरपूर: पंढरपूर विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके (Bhagirath Bahalke) यांना उमेदवारी देण्यास विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्याला भालके समर्थकांकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या सभेतच या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. यावरुन स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. (Internal conflicts between NCP workers in Pandhapur Maharashtra)

विद्यार्थी सेवक किरण घोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून भालके कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याची मागणी केली होती. भालके गटाचे वर्चस्व असणार्या विठ्ठल कारखान्याचे कामगार वेतन व शेतकऱ्यांची देणी थकली असल्याने विधानसभा पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळू नये, असे किरण घोडके यांनी पत्रात म्हटले होते. याचाच राग मनात ठेवून भालके समर्थकांनी भरसभेत किरण घोडके यांना जबरदस्त मारहाण केली. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून संबंधित कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर मतदारसंघाची उमेदवारी कोणाला?

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनामुळे रिक्त राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या जागेसाठी प्रशासकीय तयारी सुरु करण्यात आली आहे. पंढरपूरसाठी राष्ट्रवादीकडून कोणाला तिकीट दिलं जाणार, निवडणूक बिनविरोध होणार की भाजप आपला उमेदवार मैदानात उतरवणार, याची उत्सुकता आहे.

निवडणूक आयोगाने पंढरपूर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची यादी मागवली आहे. विधानसभेचे पद रिक्त झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घेण्याचा नियम असल्याने प्रशासकीय स्तरावर तयारी सुरु करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंढरपूर विधानसभेसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

भालकेंच्या सुपुत्राला वारसा

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला होता.

संबंधित बातम्या :

Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : मंगळवेढ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके गटाला धक्का

(Internal conflicts between NCP workers in Pandhapur Maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI