परळीत नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा, कुटुंबासह आमरण उपोषण सुरु

बीड : नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा करण्यात आल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील परळीत समोर आलाय. एरवी नागरिक आपल्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे जातात. पण इथे लोकप्रतिनिधीच्याच जागेवर कब्जा केल्याचा आरोप केला जातोय. आपल्या जागेवर कब्जा केल्याने नगराध्यक्षा सरोजनी हलगी यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केलंय. परळी बसस्थानक परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हलगे यांच्या सासरच्या […]

परळीत नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा, कुटुंबासह आमरण उपोषण सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

बीड : नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा करण्यात आल्याचा प्रकार बीड जिल्ह्यातील परळीत समोर आलाय. एरवी नागरिक आपल्या समस्या घेऊन लोकप्रतिनिधीकडे जातात. पण इथे लोकप्रतिनिधीच्याच जागेवर कब्जा केल्याचा आरोप केला जातोय. आपल्या जागेवर कब्जा केल्याने नगराध्यक्षा सरोजनी हलगी यांनी कुटुंबासह आमरण उपोषण सुरु केलंय.

परळी बसस्थानक परिसरात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हलगे यांच्या सासरच्या नावे 12 एकर जमीन होती. पावणेदोन एकर बाजूला ठेवून त्यांनी ती सर्व जमीन विकून टाकली. मात्र बुधवारी सायंकाळी अचानक हलगी यांच्या पावणेदोन एकर जागेवर मार्कआउट करण्यात आलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणी लेआउटही पाडण्यात आले.

सदर बाब नगराध्यक्षांच्या कानावर पडली आणि नगराध्यक्षांचे संपूर्ण कुटुंब घटनास्थळी पोहोचलं. नगराध्यक्षांच्या जागेवर कब्जा झाल्याने ही बातमी संपूर्ण शहरात पसरली. पाहता पाहता संपूर्ण शहर घटनास्थळी पोहोचलं. कब्जा हटविण्यात यावा यासाठी नगराध्यक्ष सरोजनी हलगे आणि त्यांचे पती सोमनाथ आप्पा यांनी आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत संबंधित कब्जा करणाऱ्या आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा नगराध्यक्षांसह त्यांच्या कुटुंबाने घेतलाय.

नगराध्यक्षांच्या पतीकडून पोलिसात तक्रार दाखल

नगराध्यक्षांच्याच खुल्या जागेवर कब्जा घालण्यात आल्याने कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा परळी निर्माण झालाय. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे मातब्बर नेते परळीचे प्रतिनिधित्व करतात. परळी मतदारसंघात दिवसाढवळ्या चक्क नगराध्यक्षांच्या जागेवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उत आलाय. या प्रकरणी नगराध्यक्षांचे पती सोमनाथ आप्पा हलगी यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शहरातील रवी टाक यांनी हा कब्जा केल्याचा हलगे कुटुंबाचा आरोप आहे. या प्रकरणी रवी टाक यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी याबाबत बोलण्यास साफ नकार दिला. रवी टाक हे परळीतील रहिवासी आहेत. प्लॉटिंग खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. अनेकांना प्लॉटिंगमध्ये फसवल्याचा त्यांचे वडील अरुण टाक यांच्यावर आरोप आहेत. शिवाय 20 पेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. यावेळी थेट नगराध्यक्षाचीच जागा बळकावल्याने आता रवी टाक यांच्यावर काय कारवाई होते त्याकडे परळीकरांचं लक्ष लागलंय.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.