AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PCMC Election 2022 : वॉर्ड क्रमांक 27 वरील वर्चस्व राखण्यात भाजप यशस्वी ठरणार की राष्ट्रवादी बाजी मारणार? वाचा

काँग्रेस यावेळी जोमाने मैदानात उतरली होती. मात्र राज ठाकरे यांचे दौरे आणि बैठकांची नेहमी चर्चा राहिली आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवड कोण जिंकणार असा सवाल उपस्थित झाला. मात्र आता त्याची उत्तरं जवळ दिसू लागली आहेत. 

PCMC Election 2022 :  वॉर्ड क्रमांक 27 वरील वर्चस्व राखण्यात भाजप यशस्वी ठरणार की राष्ट्रवादी बाजी मारणार? वाचा
वॉर्ड क्रमांत 27 वरील वर्चस्व राखण्यात भाजप यशस्वी ठरणार की राष्ट्रवादी बाजी मारणार? वाचाImage Credit source: tv9
| Updated on: Jul 25, 2022 | 3:01 PM
Share

पिंपरी चिंचवड– राज्यात पुन्हा महापालिका निवडणुकांची (Municipal Coroporation Election 2022) रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आधीपासूनच जोरदार कंबर कसली होती. पिंपरी-चिंचवड (PCMC Election 2022) पुन्हा जिंकण्यासाठी भाजप पूर्ण ताकद लावून लढत होतं, तर भाजपच्या हातातून (BJP) सत्ता काढून घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यासाठी अजित पवार यांनी मागील काही महिन्यात पुण्याकडचं लक्ष वाढवलं होतं. तर तिकडून पुण्यातल्या महापालिका जिंकण्याची जबाबदारी शिवसेनेकडून संजय राऊत यांना देण्यात आली होती. आदित्य ठाकरे यांचेही पुण्यातले दौरे वाढले होते. तर काँग्रेस यावेळी जोमाने मैदानात उतरली होती. मात्र राज ठाकरे यांचे दौरे आणि बैठकांची नेहमी चर्चा राहिली आहे, त्यामुळे पिंपरी-चिंचवड कोण जिंकणार असा सवाल उपस्थित झाला. मात्र आता त्याची उत्तरं जवळ दिसू लागली आहेत.

भाजप    
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे

मागच्या वेळी भाजपचा बोलबाला

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागच्या वेळी भाजपचा जोरदार बोलबाला राहिला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अवॉर्ड क्रमांक 27 मध्ये बाबासाहेब त्रिभुवन हे भाजपकडून पहिले उमेदवार म्हणून विजयी झा,ले तर सविता बाळकृष्ण खुळे याही भाजप कडूनच विजयी झाल्या भाजपच्या तिसऱ्या उमेदवार या सुनीता हेमंत तपकीर विजयी झाल्या. तर भाजपचे चौथे उमेदवार चंद्रकांत बराक नखाते, हे विजय झाले. त्यामुळे हा वाढ भाजपच्या ताब्यात निर्विवादपणे राहिला आहे. आता यावेळी हेच वर्चस्व कायम ठेवण्याचा आव्हान भाजप पुढे कायम होतं.

आकडेवारी याठिकाणी पाहा

भाजप    
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे

कशा आहेत वॉर्डच्या सीमा?

यावेळी वॉर्ड पुनरर्चना झाल्यामुळे या सीमांमध्ये बदलही होऊ शकतात, मात्र मागच्या वेळीप्रमाणे चिंचवडगाव, उद्योगनगर, क्विन्सटाऊन सोसायटी, टेल्को कंपनी, एस. के. एफ. कंपनी, रस्टन कंपनी, रामकृष्ण मोरे सभागृह, अशी या वॉर्डची व्यप्ती आहे. तर साईबाबानगर झोपडपट्टी लगतच्या रेल्वे लाईन पासून संतोष नगर पर्यंत व तेथून दक्षिणेस चिंचवड स्टेशन चिंचवडगाव लोकमान्य हॉस्पिटल लगतच्या पुलापर्यंत व तेथून पश्चिमेस चिंचवड गावाकडे जाणा-या रस्त्याने रामकृष्ण मोरे सभागृहापर्यंत व त्यालगतच्या रस्त्याने पुर्वेस धोका कॉलनी व जीवननगर रस्त्याने सुखवानी व्हिला पर्यंत व त्या लगतच्या रस्त्याने स्वामी विवेकानंद चौक, चिंचवड पिंपरी लिंक रस्त्यापर्यंत व त्या रस्त्याने कृष्णा स्विटस इमारतीच्या मागील बाजुने नाल्यापर्यंत व नाल्याने उत्तरेस चिंचवड पिंपरी लिंक रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेकडे मेट्रोपॉलिटन हौ. सोसा. पर्यंत जातो.

तर मेट्रोपॉलिटन हौ. सोसायटीच्या बिल्डींगपासून दक्षिणेकडे कालीकामाता मंदिर, प्रदीप स्विटस पर्यंत व तेथून पश्चिमेस चिंचवड पिंपरी लिंक रस्त्याने (स्वा. सावरकर मार्ग) शहीद अशोक कामठे चिंचवड पी. एम. पी. एम. एल. बसस्टॉप चौकापर्यंत व तेथून दक्षिणेस चिंचवड काळेवाडीकडे जाणा-या रस्त्याने चित्तराव गणपती मंदिरापर्यंत व पुढे पवना नदी पर्यत, अशा या वॉर्डच्या सीमा आहे.

भाजप    
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.