रामदास कदमांना दिलेलं आश्वासन गृहमंत्र्यांनी पाळलं, ‘त्या’ महिला पोलिस निरीक्षकाची बदली

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे. (PI Suvarna Patki transfer)

रामदास कदमांना दिलेलं आश्वासन गृहमंत्र्यांनी पाळलं, 'त्या' महिला पोलिस निरीक्षकाची बदली
रामदास कदम, सुवर्णा पत्की, अनिल देशमुख

रत्नागिरी : खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर बदली झाली आहे. शिवसेना आमदार रामदास कदम यांनी विधिमंडळात पत्कींविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदलीचे आश्वासन दिले होते. (PI Suvarna Patki transfer order to Raigad after Home Minister Anil Deshmukh assures Ramdas Kadam)

रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची रायगडमध्ये बदली करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात माजी मंत्री आणि शिवसेना आमदार रामदास कदम यांनी पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्कींची बदली करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.

राष्ट्रवादी-काँग्रेस मनसेकडूनही बदलीला विरोध

रामदास कदम यांनी विधानपरिषदेत सुवर्णा पत्की यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या बदलीची मागणी सभागृहात केली होती. मात्र सुवर्णा पत्की यांची बदली करु नये म्हणून खेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांनी आवाज उठवला होता. परंतु गृहमंत्र्यांनी सुवर्णा पत्की यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.

रामदास कदम यांचे आरोप काय?

“खेडमध्ये पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची मनमानी सुरु आहे. कोरोनाचे प्रतिबंधक नियम डावलून क्रिकेटसह विविध कार्यक्रमांना त्या परवानगी देत आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या या पोलिस अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करणार का?” असा सवाल रामदास कदम यांनी विचारला होता. (PI Suvarna Patki transfer order to Raigad after Home Minister Anil Deshmukh assures Ramdas Kadam)

गृहमंत्र्यांचे आश्वासन

सुवर्णा पत्की यांनी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत लावलेली उपस्थिती आणि कोरोना नियमांचे झालेले उल्लंघन यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिले होते.

मनसेची निदर्शनं

दरम्यान, रामदास कदम यांनी सुवर्णा पत्की यांच्याविषयी विधानपरिषदेत केलेली शेरेबाजी समस्त स्त्रीवर्गाचा अपमान करणारी आहे, असं सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला आघाडीतर्फे गेल्या गुरुवारी जोरदार निदर्शने करण्यात आली होती. रामदास कदम यांनी माफी मागावी, अशी जोरदार मागणी मनसेने केली होती.

संबंधित बातम्या :

राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती गेल्या 5 वर्षापेक्षा अधिक चांगली, गुन्ह्याचा दर कमी, शिक्षेचा जास्त : गृहमंत्री देशमुख

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल: अनिल देशमुख

(PI Suvarna Patki transfer order to Raigad after Home Minister Anil Deshmukh assures Ramdas Kadam)

Published On - 4:38 pm, Thu, 11 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI