मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल: अनिल देशमुख

दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (complaint lodge against praful khoda patel in mohan delkar suicide case)

मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी पटेल यांच्यावर गुन्हा दाखल: अनिल देशमुख
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र

मुंबई: दादरा व नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. (complaint lodge against praful khoda patel in mohan delkar suicide case)

अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत ही माहिती दिली. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहेत. तसेच दादरा व नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावरही गुन्ह दाखल करण्या आला आहे. डेलकर यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी काल मला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले होते. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल मोदींचे सहकारी, देशमुखांचा हल्ला

दरम्यान, काल अनिल देशमुख यांनी डेलकर आत्महत्या प्रकरमावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचं देशमुख म्हणाले होते. त्यावरून सभागृहात एकच गदारोळ माजला होता.

आधी काय घडलं?

दरम्यान, त्या आधी डेलकर प्रकरणावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात जुंपली होती. तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली होती. (complaint lodge against praful khoda patel in mohan delkar suicide case)

संबंधित बातम्या:

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी; अनिल देशमुखांचा दावा

डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव नाही; मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील फडणीसांनी हवा काढली?

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’ 

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या 

(complaint lodge against praful khoda patel in mohan delkar suicide case)

Published On - 1:09 pm, Wed, 10 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI