AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी; अनिल देशमुखांचा दावा

खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचं नाव नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. (praful khoda patel was a home minister in gujarat says anil deshmukh)

डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे पटेल हे मोदींचे सहकारी; अनिल देशमुखांचा दावा
अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र
| Updated on: Mar 09, 2021 | 3:49 PM
Share

मुंबई: खासदार मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्यांचं नाव नसल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांचा हा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटाळून लावला आहे. डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे प्रफुल्ल खेडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकेकाळी सहकारी होते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. (praful khoda patel was a home minister in gujarat says anil deshmukh)

अनिल देशमुख यांनी मोहन डेलकर प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर केलं. डेलकर यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्यांनी एका नावाचा उल्लेख केला आहे. दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचा उल्लेख आहे. पटेल यांच्यासह काही अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मला त्रास देण्यात आला. मला अडचणी येत होत्या. पटेल यांच्या माध्यमातून मला सामाजिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.

पटेल गुजरातचे माजी गृहमंत्री

प्रफुल्ल खेडा पटेल हे सध्या दादरा-नगर हवेलीमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. ते आधी गुजरातचे गृहमंत्री होते. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना पटेल हे गुजरातचे गृहमंत्री असावेत असा माझा कयास आहे. त्यानंतर पटेल यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा सभागृहात एकच गदारोळ झाला.

महाराष्ट्रावर विश्वास

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. मला महाराष्ट्रातच न्याय मिळेल, असंही डेलकर यांनी सुसाईडनोटमध्ये म्हटलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

एसआयटीमार्फत चौकशी

डेलकर याच्या आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येत असल्याचं देशमुख यांनी यावेळी जाहीर केलं.

आधी काय घडलं?

दरम्यान, त्या आधी डेलकर प्रकरणावरून फडणवीस आणि अनिल परब यांच्यात जुंपली होती. तुम्ही जबाब वाचून जर वाझेंच्या अटकेची मागणी करत असाल तर त्याच न्यायाने डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्या लोकांची नावं आहेत, त्यांना अटक केली पाहिजे, अशी मागणी परब यांनी लावून धरत विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीस यांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला. फडणवीस यांनी थेट डेलकर यांची सुसाईड नोटच सभागृहात फडकवली. माझ्या हातात डेलकर यांची सुसाईड नोट आहे. यात कोणत्याही पक्षाच्या नेत्याचं नाव नाही. प्रशासकाचं नाव आहे, प्रशासक कुणाच्याही पक्षाचे नसतात. सचिन वाझेंना वाचवण्यासाठी हे करु नये, असं सांगत फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपातील हवा काढून टाकली होती. (praful khoda patel was a home minister in gujarat says anil deshmukh)

संबंधित बातम्या:

VIDEO : फडणवीस म्हणाले, मनसुख हिरेन शेवटचे धनंजय गावडेंना भेटले, आता गावडे म्हणतात..

डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये भाजप नेत्याचं नाव नाही; मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील फडणीसांनी हवा काढली?

मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीसांनी 12 दिवसात 10 गुन्हे ठोकले, मला आयुष्यातून का उठवताय? : धनंजय गावडे

(praful khoda patel was a home minister in gujarat says anil deshmukh)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.