मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीसांनी 12 दिवसात 10 गुन्हे ठोकले, मला आयुष्यातून का उठवताय? : धनंजय गावडे

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांनी कोणावरही आरोप करताना विचार करावा. | Dhananjay Gawde

मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीसांनी 12 दिवसात 10 गुन्हे ठोकले, मला आयुष्यातून का उठवताय? : धनंजय गावडे
या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हिरेन मनसुख काळे की गोरे हेदेखील मला माहिती नाही. केवळ बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 2:16 PM

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी हिरेन मनसुख (Hiren Mansukh) यांच्या मृत्यूप्रकरणात विधानसभेत आरोपांची राळ उडवून दिली. यावेळी त्यांनी हिरेन मनसुखच्या हत्येसाठी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि धनंजय गावडे हे जबाबदार असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर आता धनंजय गावडे (Dhananjay Gawde) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना आपली बाजू स्पष्ट केली. (Police officer Dhananjay Gawde reaction after accusations in Hiren Mansukh death case)

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे त्यांनी कोणावरही आरोप करताना विचार करावा. अशाप्रकारे कोणावरही आरोप करुन त्याला आयुष्यातून उठवून नका, अशी विनंती धनंजय गावडे यांनी केली.

या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हिरेन मनसुख काळे की गोरे हेदेखील मला माहिती नाही. केवळ बिल्डर लॉबीला वाचवण्यासाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 12 दिवसांत माझ्यावर 10 खंडणीचे गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिल्यानंतर मी वसईत परतलो. हिरेन मनसुख मृत्यूप्रकरणात आरोपपत्रातही माझे नाव नाही. मात्र, काही बिल्डरांना वाचवण्यासाठी मला याप्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप धनंजय गावडे यांनी केला.

‘एनआयए संस्थेला तपास करुन द्यावा’

अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके सापडणे आणि हिरेन मनसुख प्रकरणात अनुक्रमे राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एसआयटीकडून तपास सुरु आहे. त्यांना तपास करुन द्यावा. हिरेन मनसुख यांचे लोकेशन केवळ वसईत सापडले म्हणून माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे धनंजय गावडे यांनी सांगितले.

कोण आहेत गावडे?

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक होते. गावडे हे 45 वर्षीय आहेत. ते पालिकेतील गटनेता, स्थायी समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. गावडे हे 2015 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ६३ मधून नालासोपारा परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु, बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. आचोळे येथील २६ गुंठे जमीन खरेदी प्रकरणी त्यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे 2017 मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

फसवणूक, खंडणी, बलात्काराचा आरोप

धनंजय गावडे हे नालासोपाऱ्यातील वादग्रस्त माजी नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर फसवणूक, खंडणी मागणे आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत. त्यांच्यावर 2018मध्ये एका 34 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधी त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काही बिल्डरांनी त्यांच्यावर ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. तसेच 2016मध्ये आयकर विभाग आणि ईडीने त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून 40 लाख रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या. ही रक्कम ईडीला गावडे यांच्या गाडीत मिळाली होती.

एकूण 9 एफआयआर

धनंजय यांच्यावर एकूण 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या. त्यात बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या एफआयआर 2015 ते 2018 दरम्यान दाखल करण्यात आल्या. धनंजय याने बिल्डरांना धमकी दिली की बांधलेल्या इमारती महापालिकेच्या प्लानिंगनुसार नाहीत. त्या तोडल्या जाऊ शकतात. महितीच्या अधिकाराखाली त्यांने ही माहिती काढल्याचं त्याने सांगितलं. आणि पैशांची मागणी केली. 500 हुन अधिक प्रकरणाची धनंजय आणि त्याच्या साथीदाराने माहिती मागवली, आणि त्याच माहितीच्या आधारे लोकांकडून खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला. 2015 साली धनंजय गावडे वसई-विरार मनपात नगरसेवक म्हणून निवडून आले. गावडेंवर वसई, नालासोपारा, तुलिंज, वालीव, विरार पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी 10 च्यावर गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

‘त्यांना वाटलं खाडीला भरती आहे मनुसख हिरेनची बॉडी कधी सापडणारच नाही, पण…’

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांचा तपास ‘एनआयए’ करणार; हिरेनप्रकरण एटीएसकडेच

(Police officer Dhananjay Gawde reaction after accusations in Hiren Mansukh death case)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.