पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. एसीबीच्या या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवड शहरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काल स्थायी समितीची बैठक पार पडली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या कार्यालयात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. महापालिकेकडून कामाचे टेंडर मंजूर झाले होते. त्याची वर्क ऑर्डर काढण्यासाठी एका ठेकेदाराकडे स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने 10 लाखांची लाच मागितली गेली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून कारवाई करत स्थायी समिती अध्यक्ष, त्यांचे स्वीय सहाय्यक, लिपिक, संगणक चालक आणि शिपाई अशा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. (Action of ACB against PCMC Standing Committee Chairman, NCP leaders criticize BJP)