छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारासह त्यांचे कुटुंबही आमच्यासोबत : नरेंद्र मोदी

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांसह त्यांचं कुटुंबही आहे," असे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Satara) म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारासह त्यांचे कुटुंबही आमच्यासोबत : नरेंद्र मोदी

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा साताऱ्यात पार पडली. “सातारा ही संताची भूमी आहे. तसेच ही माझी गुरुभूमी आहे. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांसह त्यांचं कुटुंबही आहे,” असे नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Satara) म्हणाले.

मी आता तुमच्यासमोर जे काही आहे, त्याचे कारण म्हणजे माझे गुरु. साताऱ्यातील खटाव गावाचे लक्ष्मणराव इनामदार हे माझे गुरु आहेत. त्यामुळे सातारा ही माझी गुरुभूमी आहे. त्यामुळे साताऱ्याची यात्रा करणे ही माझ्यासाठी तीर्थयात्रा करण्यासारखे आहे, असेही मोदी म्हणाले.

“आपला जोश हा विरोधकांचा होश उडवत आहे. यापूर्वी राष्ट्रीय एकीकरणासाठी निर्णय घेण्याची क्षमता पहिल्यांदा दिसत नव्हती. आम्ही राष्ट्र धर्मासाठी जे निर्णय घेतले. त्याला विरोध केला.” अशी टीकाही मोदींनी विरोधकांवर केली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार येथून का लढले नाहीत. शरद पवारांना राजकारणातील फासे कळतात. त्यामुळे त्यांनी लगेचच सांगून टाकलं, मी निवडणूक लढवणार नाही,” असेही मोदी (PM Narendra Modi Satara) म्हणाले.

“अनेकांनी देशासाठी अपप्रचार केला. कलम 370 बद्दल चुकीची माहिती दिली. त्यामुळे सातारकरांमध्ये चिड निर्माण झाली,” अशी टीकाही मोदींनी केली.

“शेतकऱ्यांसाठीची सर्व मदत त्यांच्या अकाऊंटमध्ये पोहोचत आहे. सबसिडी लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे. महायुतीच्या सरकाराने कोणाचेही शोषण किंवा हक्क मारलेले नाहीत. मुद्रा योजनेतून बेरोजगारांना रोजगार दिला.” असेही मोदी म्हणाले.

“येत्या सोमवारी आपल्या जवळचे पोलिंग बुथ सोडू नका. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकले पाहिजेत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *