मोदींची देशातील पहिली प्रचारसभा वर्ध्यात, गांधींच्या दर्शनाने गांधींविरोधात रणशिंग

वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वर्ध्यात होळीच्या ‘रंग’धुमाळीत प्रचाराच्या रंगाची उधळण सुरु झाली आहे. त्यात आता आणखी भर पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील पहिली जाहीर सभा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वर्ध्यात होणार आहे. वर्ध्यात  28 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन, नरेंद्र मोदी यांच्या देशातील पहिल्या …

मोदींची देशातील पहिली प्रचारसभा वर्ध्यात, गांधींच्या दर्शनाने गांधींविरोधात रणशिंग

वर्धा: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने वर्ध्यात होळीच्या ‘रंग’धुमाळीत प्रचाराच्या रंगाची उधळण सुरु झाली आहे. त्यात आता आणखी भर पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशातील पहिली जाहीर सभा राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वर्ध्यात होणार आहे. वर्ध्यात  28 मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे.

भाजपने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन, नरेंद्र मोदी यांच्या देशातील पहिल्या जाहीर सभेची घोषणा केली आहे. नरेंद्र मोदी भाजपच्या प्रचाराचा नारळ वर्ध्यातून फोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर मोदींची प्रचारसभा होणार आहे. त्याआधी मोदी सेवाग्राम इथे महात्मा गांधी यांच्या आश्रमातील बापू कुटीला भेट देणार आहेत.

गांधींच्या कर्मभूमीतून भाजप प्रचाराचं बिगुल वाजवणार असल्याने, उत्सुकता वाढली आहे. 2014  मध्ये लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात देखील मोदींनी वर्ध्यातूनच केली होती. महात्मा गांधींचे दर्शन घेत भाजपचा प्रचार प्रारंभ  होणार आहे. गांधींच्या भूमीतून मोदी आणि भाजप राहुल गांधी तसंच  काँग्रेसवर हल्लाबोल करतील.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *