पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट, प्रवीण दरेकरांची टीका

पोलीस अधिकाऱ्यांकडून महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न, अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट, प्रवीण दरेकरांची टीका

सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. (Anil deshmukh Big Statement on Mahavikasaaghdi government)

Namrata Patil

|

Sep 20, 2020 | 10:35 AM

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. लोकमत ऑनलाईनच्या विशेष मुलाखतीत याबाबतचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Home Minister Anil deshmukh Big Statement on Mahavikasaaghdi government)

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. चार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असे अनिल देखमुखांनी सांगितले.

“आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असे वारंवार सांगितले गेले, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.”

“या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमच्यात चर्चा झाली. त्यानंतर हे प्रकरण मार्गी लावण्यात आले,” असेही अनिल देशमुखांनी यावेळी सांगितले.

“शरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या असे सांगितले होते. तसेच्या त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला,” असेही अनिल देशमुख म्हणाले.

“नुकत्याच झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये त्यातील अधिकाऱ्यांची बदली केली गेली. तर काही अधिकाऱ्यांना आजही त्यांना महत्त्वाची पदं दिली आहेत,” असेही अनिल देशमुख म्हणाले.

गृहमंत्र्यांना हे बोलणं अपेक्षित नाही – प्रवीण दरेकर 

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुखांवर टीका केली. राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित नाही. अशा अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात हिंमत नाही. त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. ते कोरोनापासून लक्ष विचलित करण्यासाठी मुलाखत देत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले. (Home Minister Anil deshmukh Big Statement on Mahavikasaaghdi government)

संबंधित बातम्या : 

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरुन भाजपने राजकारण न करता साथ दिली पाहिजे : बाळासाहेब थोरात

मराठा आंदोलनाच्या भीतीमुळे मुंबईत संचारबंदी, चंद्रकांत पाटलांची सरकारवर टीका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें