शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली? मोहन भागवत यांच्या विधानाने नवा वाद; कोण काय म्हणालं?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी विधान केलं आहे. त्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध कुणी लावला याबाबतच्या या प्रतिक्रिया आहेत.

शिवाजी महाराजांची समाधी कुणी शोधली? मोहन भागवत यांच्या विधानाने नवा वाद; कोण काय म्हणालं?
mohan bhagwatImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 7:55 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली होती. शिवाजी महाराजांवर पहिला पोवडा महात्मा फुले यांनीच लिहिला होता. असं असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक नवं विधान करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. या मुद्द्यावर आता विरोधकांनी प्रतिक्रिया व्यक्त करून मोहन भागवत यांची चांगलीच कोंडी केली आहे. तर भाजपच्या नेत्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.

पुण्यात काल मिलिंद पराडकर याांच्या ‘तंजावरचे मराठे’ या पुस्तकाचं मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचं श्रेय लोकमान्य टिळकांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी महाराजांचं राज्य किती होतं? आज सरकारी महाराष्ट्र आहे, तेवढंही नव्हतं. पण आग्र्याहून परत आल्यावर स्वराज्य येणार हे निश्चित होतं. सर्वांना संघर्ष सापडला. सर्वांना मार्ग सापडला आणि सर्व यशस्वी झाले. शिवाजी महाराज इंग्रजांविरुद्ध लढले. शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. त्यांचं स्मरण व्हावं आणि जागरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला. टिळकांनी ते सर्व शोधून काढलं. वगैरे, वगैरे. रवींद्रनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली, असा दावा मोहन भागवत यांनी केला होता.

हिंदू शब्द सर्व वापरत नाही

स्वातंत्र्यासाठी सर्वांचे प्रयत्न कोणत्या प्रेरणेने सुरू होते? त्याला हिंदू शब्द सर्व वापरत नाहीत. पण सुभाष बाबूंनी संकोच न करता हिंदू हा शब्द वापरलाय. पण सर्व लोक हा शब्द नाही वापरत. विशिष्ट प्रकारचा ग्रंथ मानणारे, विशिष्ट प्रकारचा विचार मानणारे ही त्यांची नावे आहेत. हिंदू हे असं नाव नाही. हे सर्व एका विशिष्ट स्वभावात जेव्हा वागू लागतात तेव्हा त्या स्वभावाचं वर्णन करणारं विशेषण म्हणजे हिंदू आहे. धर्म म्हणजे पूजा नाही, धर्म म्हणजे हे खा, ते खा, पूजा करू नका, शिवू नका वगैरे वगैरे नाही. हा धर्म नाही. धर्माची मूल्य ही सत्यातून आलीय. सत्य, करुणा, सूचिता आणि तपस्या असं धर्माचं वर्णन आहे, असं भागवत म्हणाले.

नेमकं ध्वनीत होत नाही

दरम्यान, भागवत यांच्या या विधानावर इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. रायगडावरील समाधी बाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख संदिग्ध बोलले आहेत. वगैरे, वगैरे असे शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं आहे हे ध्वनीत होत नाही. पण लोकमान्य टिळकांमुळेच रायगड, शिवाजी महाराज यांचा उत्सव लोकांसमोर आला असं त्यांना म्हणायचं असेल, असं इंद्रजित सावंत म्हणाले.

हा अभ्यास भागवतांनी केला नाही

इतिहास बघितला तर 1869 मध्ये महात्मा जोतिबा फुले हे विस्मरणात गेलेल्या रायगडावर पहिल्यांदा गेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा पुनर्शोध त्यांनी घेतला. समाधीची अवस्था बघून पुण्यात आल्यानंतर अर्वाचीन इतिहासातील सर्वात मोठा पोवाडा देखील महात्मा फुले यांनी लिहिला. शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जिर्णोद्धाराची चळवळ देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली. लोकमान्य टिळकांचे साथीदार असलेल्या केळकर यांच्या देखील आत्मचरित्रात याचे उल्लेख आढळतात. हा अभ्यास आदरणीय भागवत सरांनी केलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांच्याकडून अशी वक्तव्य होत आहेत, असा चिमटा इंद्रजित सावंत यांनी काढला.

स्टेटमेंट ऐकलं नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले. मी कुणाचे स्टेटमेंट ऐकले नसल्यामुळे मी त्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महात्मा फुलेंनीच समाधी शोधून काढली

राज्याचे मंत्री आणि अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळ यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतीराव फुले यांनीच शोधून काढली आहे. हा इतिहास कोणालाही बदलता येणार नाही. शिवजयंती उत्सव सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केला आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

या वादात पडू नये

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनीच शोधली. त्यांचं योगदान सर्वांना माहीत आहे. पण या वादात पडू नये. लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले समकालीन होते. दोघांनीही त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांबाबत ज्या भूमिका घेतल्या त्या महत्त्वाच्या होत्या. त्यामुळे या वादात पडू नये. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. समाधी रायगडावर आहे. त्याचं स्मरण आणि निगा राखली पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.