AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीची चुरस वाढली, पडळकरांच्या एन्ट्रीने तिरंगी लढत निश्चित

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. या लढतीत आतापासूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून कुरघोडीचं राजकारण सुरु झालं आहे. सांगलीत भाजपकडून खासदार संजय पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक रिंगणात उभे राहिलेत. भाजपचे बंडखोर नेते आणि […]

सांगलीची चुरस वाढली, पडळकरांच्या एन्ट्रीने तिरंगी लढत निश्चित
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. या लढतीत आतापासूनच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून कुरघोडीचं राजकारण सुरु झालं आहे.

सांगलीत भाजपकडून खासदार संजय पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे निवडणूक रिंगणात उभे राहिलेत. भाजपचे बंडखोर नेते आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही संपूर्ण ताकदीनिशी प्रस्थापितांशी टक्कर देण्यासाठी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे.

भाजपचे खासदार संजय पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2 एप्रिलला अर्ज दाखल करतील. तर गोपीचंद पडळकर हे 3 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.. त्यामुळे संजय पाटील, विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर या तिघांमध्ये सांगलीची लढत असणार आहे.

आरोपांच्या फैरी

सांगलीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु होताच एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून होतो आहे. आमच्या दादा घराण्याचे दूध पिऊन आमच्यावर फुसफुसत आहेत आणि गुर्मी करत आहेत, असा टोला विशाल पाटील यांनी संजय पाटलांना लगावला आहे.

विशाल पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना खासदार संजय पाटील यांनीही जोरदार टीका केली. बाळ बाळुत्यात असल्यापासून मी बघतोय, मैदानात येऊ दे मग योग्य तो खरपूस समाचार घेतो, असा इशाराच संजय पाटलांनी विशाल पाटील यांना दिला.

एकीकडे दोन्ही पाटलांमध्ये आरोपांच्या फैरी झडलेल्या असताना धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनीही या दोघांना तगडी टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पडळकर यांनी संजय पाटलांवरही टीका केली आहे. कृष्णा खोरे महामंडळातून कॉन्ट्रॅक्टरच्या मागे फिरून संजय पाटलांनी टक्केवारी गोळा केल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. संजय पाटलांना मोकळा करण्यासाठी मी आलोय, असं आवाहन पडळकर यांनी केलं आहे.

तसेच, संजय पाटील हा भिकारी माणूस असून तो मला काय देणार अशी टीकाही पडळकर यांनी केली आहे. संजय पाटलांना जिल्ह्यातला मंत्री नको होता म्हणून सुभाष देशमुखांनी शेजारच्या जिल्ह्यातला माणून आणून त्याला पालकमंत्री केले, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.

स्वाभिमानीकडून विशाल पाटील यांनी जोर लावला आहे, तर खासदार संजय पाटील सांगलीवर आपला ठसा उमटवू पाहत आहेत. दुसरीकडे भाजपचे बंडखोर गोपीचंद पडळकर हेही मैदानात पूर्ण ताकदिनीशी उतरलेत. त्यामुळे सांगलीचे मैदान आणखी रंजक होणार, हे निश्चित.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ