वंचितचा विरोधी पक्षनेता नव्हे, मुख्यमंत्री असेल : प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला प्रस्ताव देऊन दोन आठवडे झालेत. त्यांच्या कोणत्याही नेत्यांकडून आम्हाला संपर्क झालेला नाही. अनेक नेते दिल्लीवारी करून आले, पण अजून संपर्क नाही, अशीही माहिती प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिली. शिवाय आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल, असं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.

वंचितचा विरोधी पक्षनेता नव्हे, मुख्यमंत्री असेल : प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Sep 04, 2019 | 5:45 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आपली व्यूहरचना जाहीर करत नाही, तोपर्यंत आम्ही दिलेली 144 जागांची ऑफर घेऊन चर्चेसाठी दारं कधीही खुली आहेत, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटलंय. काँग्रेसला प्रस्ताव देऊन दोन आठवडे झालेत. त्यांच्या कोणत्याही नेत्यांकडून आम्हाला संपर्क झालेला नाही. अनेक नेते दिल्लीवारी करून आले, पण अजून संपर्क नाही, अशीही माहिती प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिली. शिवाय आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल, असं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलंय.

पुढचा विरोधी पक्ष नेता वंचितचा असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी वंचितची ताकद वाढल्याचं मान्य केलंय. त्यांनी चारिटेबली आम्हाला विरोधी पक्षनेते पद दिलं. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो वंचितचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“तोपर्यंत काँग्रेसला चर्चेची दारं खुली

आम्ही पक्षांतर्गत ठरवलं होतं की आपण काँग्रेसला जी ऑफर दिली आहे 144-144 ची त्यावर काही उत्तर येतं का? याची वाट पाहायची. तसं नाही झालं तर आपल्या स्ट्रॅटेजीला लागायचं. आम्ही रणनीती तयार केली आहे. या आठवड्यात ती जाहीर करू. 8 सप्टेंबरला नागपूर संविधान चौकातून रॅली निघेल. प्रत्येक दिवसाला 2 ते 3 जिल्हे कव्हर केले जातील. 18 तारखेला कोल्हापूरमध्ये समारोप होईल. राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे हा या रॅलीमागचा उद्देश आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.

मी जोपर्यंत व्यूहरचना जाहीर करत नाही, तोपर्यंत चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही व्यूहरचना जाहीर केली त्या दिवसापासून चर्चेचे दरवाजे बंद होतील, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. एकीकडे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून काँग्रेस वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. तर वंचितने 144 जागा देऊन काँग्रेसच्या प्रयत्नांची हवा काढली आहे.

एमआयएम आमच्या सोबत आहे. अंतिम स्वरुप यासाठी नाही, कारण काँग्रेससोबत काय होतं हे अजून आम्हाला कळत नाही. जागा वाटप केल्या तर परत माघार घेणं कठीण असतं. काँग्रेसने एखादी जागा त्यामधली मागतली तर सेटलमेंट होत नाही. हे टाळण्यासाठी थांबलो आहोत. एमआयएम आमच्यासोबत आहे. त्यांच्याबरोबर आमची युती पक्की आहे, असंही प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्याय सरकारमध्ये ‘आपत्कालीन विभागा’चे अध्यक्ष होते. फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची तयारी राष्ट्रवादीने दर्शवली. त्यामुळे हे सेक्युलर आहेत याची खात्री तरी आहे का? आम्ही काँग्रेसला हेच विचारत आहोत. आम्ही आमचेच आहोत. नरोबा कुंजरोवा वाल्यांशी आम्हाला युती करायचीच नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

दरम्यान राज्यात सध्या भाजपची महाजनादेश यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आणि काँग्रेसची महापर्दाफाश यात्रा सुरु आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकर यांच्या रॅलीचीही भर पडणार आहे.

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.