AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे; प्रवीण दरेकर यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या  नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे; प्रवीण दरेकर यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला
| Updated on: Oct 27, 2022 | 2:17 PM
Share

मुंबई : भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Pranin Darekar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या  नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जे आम्हाला सोडून गेले ते कधी आमचे नव्हतेच तर त्यांचा काय विचार करायचा आहे. आता जे आमच्यासोबत येत आहेत ते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत, असं पेडणेकर यांनी म्हटलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे.  बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा ते नाराज शिवसैनिकांची विचारपूस करायचे, त्याच्याशी चर्चा करायचे पण आता अंहकार आडवा येत असल्याचा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

दरेकर यांनी नेमकं काय म्हटलं?

भाजप नेते दरेकर यांनी किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्याच्या शिवसेनेत हाच तर प्रॉब्लेम आहे. बाळासाहेब ठाकरे हे नाराज शिवसैनिकांना बोलवायचे, त्यांची अपुलकीनं चौकशी करायचे, मायेन त्याच्या पाठिवरून हात फिरवायचे. त्याच्याशी चर्चा करायचे त्यानंतर पुन्हा ही नाराज मंडळी शिवसेनेच्या प्रवाहात सहभागी होऊन काम करायची, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

54 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेले

मात्र आता जे सोडून गेले ते लोक यांना महत्त्वाचे वाटत नाहीत. 54 आमदारांपैकी 40 आमदार सोडून गेलेत, ते आमदार यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीत. कारण अंहकार आडवा येतो. यांनी काँग्रेस , राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. आता ते भारत जोडो यांत्रेला देखील उपस्थित राहणार आहेत, असा टोला प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...