…तर त्यांच्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करु : प्रविण गायकवाड

...तर त्यांच्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करु : प्रविण गायकवाड


मुंबई: संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड यांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश होत आहे.काँग्रेस नेते मलिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. त्यासाठी प्रविण गायकवाड मुंबईत दाखल झाले. “गेली महिनाभर काँग्रेसकडे इच्छा व्यक्त केली होती, मात्र काही तांत्रिक बाबींमुळे माझा पक्षप्रवेश लांबला होता, तो आज होत आहे”, असं प्रविण गायकवाड म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. पुण्याची उमेदवारी कुणाला मिळेल हे सांगू शकत नाही, मात्र ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करु, असं प्रविण गायकवाड म्हणाले.

…म्हणून मी काँग्रेसमध्ये

मोदी आणि फडणवीस सरकार शेतकरी, कामगार कष्टकऱ्यांवर अन्याय करतंय. आज बेरोजगारी 41 टक्क्यावर गेली आहे. तरुणांना रोजगार नाही, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण नाही. असुरक्षिततेचं वातावरण आहे.  जातीवाद पसरला आहे. अशा पार्श्वभूमीवर मला वाटतं काँग्रेस पुरोगामी विचाराची आहे. नेहरु गांधींबरोबरच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष संघटना आहे. त्यांच्यासोबत सर्व पुरोगामी विचाराच्या संघटनांनी एकत्र येऊन काम करावं, नरेंद्र मोदी सरकार परत आलं तर संविधानला धोका आहे, कदाचित निवडणुका होणार नाहीत. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेस आवश्यक आहे. काही तांत्रिक बाबींमुळे माझी प्रवेशाची प्रक्रिया लांबली होती, आज होईल, असं प्रविण गायकवाड म्हणाले.

..म्हणून मी उमेदवारी मागे घेतली

पक्षाने कुणाला तिकीट द्यावं हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. पुण्यात ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी आमदार, माजी नेत्यांनी विनंती केली की पक्षातील उमेदवाराला उमेदवारी द्यावी. मी निश्चित त्याचा सन्मान करतो. त्यामुळेच मी दोन दिवसांपूर्वी माजी उमेदवारी मागे घेतली. काँग्रेसने तातडीने उमेदवार जाहीर करावा हा त्यामगाचा हेतू होता. भाजपने गिरीश बापटांची उमेदवारी जाहीर होऊन 8 दिवस झाले. निवडणूक कालावधी कमी होत आहे, आपल्याला पुण्यातील जागा जिंकायची आहे, त्यामुळे लवकर उमेदवार जाहीर करावा अशी माझी इच्छा होती. त्यामुळे माझी उमेदवारी मागे घेतली, असं प्रविण गायकवाड यांनी सांगितलं.

काँग्रेसला इतिहास आणि अभ्यास

काँग्रेसला इतिहास आणि अभ्यास आहे. कोण निवडून येऊ शकतं, कोणाचं सोशल इंजिनिअरिंग आहे, या सगळ्याचा अभ्यास, विचार करुन देशातील 548 जागांचा तिढा सोडवला जातो.कदाचित त्यामुळेच पुण्याचा महत्त्वाचा विषय मागे राहिला असेल, परंतु आज तो सुटेल अशी आशा करु, असं प्रविण गायकवाड यांनी नमूद केलं.

ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्यासाठी ताकदीने काम करु

पुण्याचा तिढा आज सुटेल. निवडणुकीसाठी राहिलेला वेळ उपयोगात आणायचा आहे. पुण्यात कुणाला उमेदवारी मिळेल हे सांगू शकत नाही, मात्र ज्याला उमेदवारी मिळेल, त्याच्यासाठी शंभर टक्के ताकदीने काम करु, असं यावेळी प्रविण गायकवाड यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या 

प्रविण गायकवाड पुन्हा शर्यतीत, काँग्रेसमध्ये आज प्रवेश करणार  

काँग्रेसकडे उर्मिलासाठी वेळ, माझ्यासाठी नाही, प्रविण गायकवाडांची माघार  

सुरेखा पुणेकर 3 दिवसांपासून दिल्लीत, काँग्रेसकडून लावणी सम्राज्ञीला पुण्याचं तिकीट? 

पुणे काँग्रेस भवनात शुकशुकाट, उमेदवार जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी  

बापटांविरोधात पुण्यात काँग्रेसकडून ‘ही’ पाच नावं चर्चेत!   

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?   

उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे  

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI