ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय : प्रवीण दरेकर

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना ते ब्राह्मण असल्यानेच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे (Pravin Darekar on Devendra Fadnavis Caste criticism ).

ब्राह्मण असल्यानेच देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातंय : प्रवीण दरेकर

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना ते ब्राह्मण असल्यानेच टार्गेट केलं जात असल्याचा आरोप केला आहे (Pravin Darekar on Devendra Fadnavis Caste criticism ). तसेच फडणवीस यांच्यामुळेच मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण मिळाल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्रात 40 वर्षे मराठा मुख्यमंत्री झाले पण ते आरक्षण देऊ शकले नाही, असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

प्रवीण दरेकर म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट केलं जात आहे. खरंतर देवेंद्र फडणवीस यांनीच उच्च न्यायालयात लढून मराठा समाजाला आरक्षण दिलं. तरीही काही मुठभर लोक पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या कुठल्यातरी नेत्याच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस यांना ब्राह्मण असल्याने टार्गेट करतात ही वस्तूस्थिती आहे. मात्र, मराठा समाजाला हे माहिती आहे की देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण दिलं आहे.”

“40 वर्षे मराठा मुख्यमंत्री झाले, ही 40 वर्षे कुणाची सरकारं होती? पण ते आरक्षण देऊ शकले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं. त्याचाच पोटसूळ काही मुठभर मंडळींच्या मनात आहे. त्याचं प्रत्यंतर वेळोवेळी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून काही व्यक्तींच्या तोंडातून येतं. पुरागामी महाराष्ट्राचं कौतुक करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रगल्भ व्यक्तीच्या तोंडात असं वक्तव्यं येतं हे अत्यंत वेदनादायक आहे. टीका करणाऱ्यांनी यावर विचार करायला हवा,” असं प्रवीण दरेकर म्हणाले.

कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकार एकिकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करु नका म्हणत आहे. दुसरीकडे जर आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्राकडे टोलवाटोलवी केली जात असेल, तर मग आम्हीही गप्प बसणार नाही. आमचीही भूमिका बदलेल, असा इशारा दरेकर यांनी दिला.

पोलीस भरतीसाठी ही योग्य वेळ नाही. हा मराठा तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा निर्णय आहे. यामुळे मराठा समाजाचा उद्रेक होईल. सरकार मराठा आंदोलकांना डिवचण्याचं काम करतंय. हे योग्य नाही. हे होता कामा नये, असंही प्रवीण दरेकर म्हणाले.

“माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा, फरक पडत नाही”

प्रवीण दरेकर यांनी सायन रुग्णालयातील आंदोलनावरुन गुन्हा दाखल झाल्याबद्दल सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा, मला काही फरक पडत नाही. सायनमध्ये आम्ही आंदोलन केलं, तर गुन्हा दाखल करता. खरं बोललं तर तोंड दिसतं. माझ्यावर हजार गुन्हे दाखल करा, काही फरक पडत नाही.”

हेही वाचा :

राज्यातील पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा बाजूला काढणार : अनिल देशमुख

Police Bharti | मराठा समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम, पोलीस भरतीवरुन नितेश राणे आक्रमक

संबंधित व्हिडीओ :

Pravin Darekar on Devendra Fadnavis Caste criticism

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *