शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर

प्रविण दरेकरांनी 'मी पवारांना पत्र पाठवलं आणि हो लेखाजोखा ही पाठवतोय, आता ते बघून तरी त्यांना माझी लाज वाटणार नाही,असं म्हटलं आहे. (Pravin Darekar)

शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर
प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 6:58 PM

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्राचे जाणते नेते असं बोलले, की काय तर मला वाईट वाटत म्हणे, की मी पण कधी विरोधी पक्षनेता होतो’. शरद पवारांच्या त्या वक्तव्यावर प्रविण दरेकरांनी ‘मी पवारांना पत्र पाठवलं आणि हो लेखाजोखा ही पाठवतोय, आता ते बघून तरी त्यांना माझी लाज वाटणार नाही. ते बघून तरी त्यांनी असंच खुल्या दिलानं कौतुक करावं, अशी अपेक्षा प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. मुंबईतील शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना मी केलेला भेंडीबाजारचा उल्लेख झोंबला, असं प्रविण दरेकर म्हणाले. शरद पवार यांना 26 जानेवारीला घेतलेल्या पत्रकार परिषेदेत पत्रकारांनी प्रवीण दरेकरांनी केलेल्या टीकेविषयी विचारले होते. त्यानंतर शरद पवारांनी प्रवीण दरेकरांवर टीका केली होती. (Pravin Darekar gave answer to Sharad Pawar in his book publication programme)

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या कारकिर्दीच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ पुस्तकाचं प्रकाशन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांची उपस्थिती होती.

देवेंद्रजींनी न मागता भरभरून दिलं

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कधीच काही नाही मागितलं नाही. न सांगता न मागता मला आमदार केलं आणि तसंच विरोधी पक्षनेता ही बनवलं त्यांनी मला जबाबदारी दिली. मी माझ्या नेत्याला पक्षाला आणि जनतेला उत्तर द्यायला जबाबदार आहे, असंही दरेकर म्हणाले. ज्यावेळी जंगलात वादळ आल होत तेव्हा जंगलातले वाघ बिळात बसले होते, तेव्हा प्रविण दरेकर, देवेंद्र फडणवीस सगळीकडे वादळाचा सामना करत फिरत होते, असा टोला दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला. देवेंद्र फडणवीस अजूनही वस्तादच आहेत ते अजूनही या सगळ्यांशी एकटेच लढत आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले. ज्या झाडाला फळ त्यालाच दगड मारतात, जिथे फळ नाही तिथे कोणी जात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले.

काय म्हणाले होते प्रविण दरेकर?

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे पार पडलेल्या शेतकरी मोर्चावर टीका केली होती. या आंदोलनात शेतकरी कमी इतर लोकच जास्त घुसवली आहेत. भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी, असा सवाल प्रवीण दरेकर यांनी विचारला होता. आंदोलनाला प्रतिसाद मिळत नसल्यानेच अशाप्रकारची गर्दी गोळा करण्याची आघाडीवर वेळ आल्याची टीकाही त्यांनी केली होती.

शरद पवारांकडून प्रवीण दरेकरांचा खास शैलीत समाचार

प्रविण दरेकर यांचे हे वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो. आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

प्रविण दरेकरांचे प्रत्युत्तर

“माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं, परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं”, असं दरेकर म्हणाले.पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, “वस्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का? शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही”

भाजप आमदार आशिष शेलार यांनी जो जनतेसाठी काम करतो तोच जनतेसमोर त्या कामाची मांडणीही ठासून करू शकतो, अशा शब्दांमध्ये प्रवीण दरेकरांचे कौतुक केले. प्रवीण दरेकरांनी जास्त वेळ विरोधी पक्षनेते राहू नये एवढीच इच्छा आहे, असंही शेलार म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आता मात्र सुदर्शन चक्र काढावाच लागेल. बस ते सुदर्शन चक्र यशवंतराव चव्हाण सभागृहातूनच काढा, असं आवाहन आशिष शेलारांनी केले.  भेंडीबाजार म्हणलं की सिल्वर ओकला त्रास होतो आणि बेहराम पाडा म्हणलं की मातोश्रीला त्रास होतो, असा टोला शेलारांनी लगावला आहे.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

(Pravin Darekar gave answer to Sharad Pawar in his book publication programme)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.