ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक

राज्य सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue

ठाकरे सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आक्रमक
Pravin Darekar
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 12:21 PM

कोल्हापूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सातत्यानं उफाळून येत असतात. विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्त्यांचा वाद सुरु असतानाच आणखी एक वादाचा प्रसंग पुढे आला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयानं परवानगी दिली नसल्याचं कळतंय. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची नामुष्की ओढावली. विरोधी पक्षांकडून याप्रकरणी राज्य सरकारविरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. (Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue)

राज्य सरकारनं अतिरेक केला

राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्य सरकारनं अतिरेक केला आहे. सूड भावना त्यांच्यामध्ये किती भरलीय हे स्पष्ट होत आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये केंद्राकडे बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

राज्यपालांची सरकारनं क्षमा मागावी, सुधीर मुनगंटीवरांची प्रतिक्रिया

राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या सरकारनं राज्यपालांना विमानातून खाली उतरवलं आहे. त्यांना जनता सत्तेतून खाली उतरवेल, अशी आक्रमक भूमिका सुधीर मुनगंटीवारांनी मांडली आहे. सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देऊन विषय संपवला पाहिजे. विमानात तांत्रिक अडचण होती हा खुलासा देऊन हा विषय संपवावा, मात्र, जाणीवपूर्वक केलं असेल तर गंभीर बाब आहे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

मला याबाबत काही माहिती नाही, मंत्रालयात जाऊन याबद्दल नक्की झालेल्या प्रकाराची माहिती घेऊन सांगणार आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली, विमानातून उतरुन कोश्यारी राजभवनात

राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता तुम्हाला सत्तेतून खाली खेचेल : सुधीर मुनगंटीवार

Pravin Darkear slams Thackeray government over governor Bhagat Singh Koshyari air travel cancel issue

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.