AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

President Election : भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; शिवसेनेच्या खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र

शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला मतदान करावे अशी मागणी आता शिवसेनेच्या खासदारांकडून सुरू आहे. याबाबत उद्धव ठाकरे यांना पत्र देखील पाठवण्यात आले आहे.

President Election : भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; शिवसेनेच्या खासदाराचे उद्धव ठाकरेंना पत्र
| Updated on: Jul 08, 2022 | 11:02 AM
Share

पालघर: राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपाकडून (BJP)  द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu)  तर विरोधीपक्षांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, टीेएमसी, एवढेच नव्हे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेने कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावरून आता अंतर्गत मतभेत निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी आता शिवसेनेच्या खासदारांकडून सुरू झाली आहे. याबाबत पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी पत्र लिहिले आहे.

काय म्हटलंय गावित यांनी?

खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहेत. या पत्रामध्ये गावित यांनी शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. देशाला स्वातत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाकडून आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळाली आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास भारतातील आदिवासी समाजाला यामुळे मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. त्यामुळे शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी गावित यांनी केली आहे. आता शिवसेना या पत्रानंतर काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भाजपाचे पारडे जड

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. मात्र तरी देखील संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत भाजपाचे पारडे जड माणण्यात येत आहे. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?