Presidential election Result : द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित, तासाभरात घोषणा; 800 मतांनी आघाडीवर

Presidential election Result : द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 मते मिळाली होती. तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती. आता दुसऱ्या राऊंडमध्ये मुर्मू यांना 809 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना दुसऱ्या राऊतंडमध्ये 329 मते मिळाली आहेत. मुर्मू यांना दोन्ही राऊंड मिळून 1349 मते मिळाली आहेत.

Presidential election Result : द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित, तासाभरात घोषणा; 800 मतांनी आघाडीवर
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 6:22 PM

नवी दिल्ली: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपद्री मूर्मू (Draupadi Murmu) यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तासाभरात मतमोजणी संपल्यानंतर मुर्मू यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या फेरीत आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीतही मुर्मू यांनी आघाडी घेतली आहे. मुर्मू यांना दुसऱ्या फेरीत 1349 मते मिळाली आहेत. तर संपुआचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 537 मते मिळाली आहेत. म्हणजे मुर्मू या तब्बल 800 मते घेऊन आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीची मतमोजणी संपली आहे. आता तिसरी फेरी सुरू होणार आहे. अर्ध्या तासात ही फेरी संपण्याची शक्यता असून तासाभरात देशाच्या नव्या राष्ट्रपतीची (Presidential election Result) घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे या निकालाकडे केवळ देशाचंच नाही तर जगाचंही लक्ष लागलं आहे. मात्र, या निकाला आधीच द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मुर्मू यांच्या गावातील लोक राजधानी दिल्लीत दाखल झाले असून पारंपरिक पद्धतीने ते मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करणार आहेत.

द्रौपदी मुर्मू यांना पहिल्या फेरीत 540 मते मिळाली होती. तर यशवंत सिन्हा यांना 208 मते मिळाली होती. आता दुसऱ्या राऊंडमध्ये मुर्मू यांना 809 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना दुसऱ्या राऊतंडमध्ये 329 मते मिळाली आहेत. मुर्मू यांना दोन्ही राऊंड मिळून 1349 मते मिळाली आहेत. तर सिन्हा यांना दोन्ही राऊंड मिळून फक्त 537 मिळाली आहेत. म्हणजे मुर्म या एकूण 812 मतांची आघाडी घेतली आहे. आता तिसरा राऊंड बाकी असून या तिसऱ्या राऊंडमध्येही मुर्मू आघाडी घेतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आतापर्यंत मुर्मू यांच्या मतांची व्हॅल्यू 4.83 लाख झाली आहे. तर यशवंत सिन्हा यांच्या मतांचे मूल्य 1.89 लाख झालं आहे.

हे सुद्धा वाचा

सव्वा लाख गावात जल्लोष

मुर्मू यांचा विजय निश्चित झाल्याने दिल्ली, मुंबई आणि नागपूर येथील भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष केला जात आहे. देशातील 1 लाख 35 हजार गावात जल्लोष केला जाणार आहे. या गावांमध्ये आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे. दिल्लीत भाजप रोडशोही करणार आहे. स्वत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा या रोडशोला संबोधित करणार आहेत. पहिल्यांदाच आदिवासी चेहरा राष्ट्रपतीपदावर बसत असल्याने देशभर त्याचा जल्लोष सुरू आहे. मुर्मू यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेरही मोठ्या होर्डिंग लावण्यात आल्या आहेत.

केजरीवालांकडून डिनर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या 24 जुलै रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाला डिनर देणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी 7 वाजता डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.