AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithviraj Chavan : गोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पेटला; पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, व्यक्त केली मोठी भीती

Prithviraj Chavan : गोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पेटल्याचं पाहायला मिळत आहे. संघातील अध्यक्ष निवडीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

Prithviraj Chavan : गोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पेटला; पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल, व्यक्त केली मोठी भीती
prithviraj chavanImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 8:01 AM
Share

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीचा वाद पेटला आहे. अध्यक्ष निवडीसाठी अतिरिक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघाच्या संचालक वाढीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं भाष्य केलं आहे. गोकुळमध्ये कायदा बदलणं हे हुकूमशाहीचं लक्षण असल्याचे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी मोठी भीती देखील व्यक्त केली.

गोकुळमधील संचालक वाढीवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधलाय. संचालक वाढीचा निर्णय हा सरळसरळ हुकूमशाही, दादागिरी असल्याचं त्यांनी म्हटलं. गोकुळच्या निवडणुकीत लोकांचे अधिकार काढून आपल्या विचारांची माणसं बसवणं,  संस्थेवर जबरदस्ती कब्जा करणे हे सगळं चाललं आहे. लोक करतील का नाही हे माहिती नाही. कोर्ट कचेरी होईल, शेवटी सरकर आहे’.

चव्हाण पुढे म्हणाले, ‘सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काय झाले हे तुम्ही पाहिलं. भाजप नेत्यांनी थेट सरकारच्या मंत्र्‍यांना मारहाण केली. कोणत्याही प्रकारे सत्ता हातात ठेवणं. ज्ञानेश कुमार यांचा वापर करून मतदारयादीतून 13 कोटी नावे वगळणे, ईव्हीएम मशीन, गोकुळ कायदा बदलणे प्रक्रिया, ही सगळी हुकूमशाहीची  लक्षण आहेत, अशी टीका पृथ्वीराज यांनी केली.  तर जेनझी तरुणांनी ज्या विरोध केला, त्यामुळे शिक्षणमंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय. आता  लोकांनी शेवटी रस्त्यावर उतरून विरोध केला नाही, तोपर्यंत गोकुळ सारख्या संस्था, ऊस शेतकरी आंदोल सरकार दडपून टाकेल. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरावे लागेल.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, ‘आम्ही काल सत्याग्रह केला. मी त्यामध्ये सहभागी झालो. ऊस शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय. सध्या लोकांमध्ये प्रचंड चीड आहे. आता राज्यात दुष्काळी स्थिती आहे. 2018 सालापासून ऊसाची एमएसीपी वाढलेली नाही. महागाई वाढत चालली असून उत्पादन खर्च देखील फार वाढलाय.  त्यात शेतकऱ्यांना देखील उचित मोबदला मिळालेला नाही. या विरोधातच आंदोलन सुरू होतं. गोकुळ असेल इतर आंदोलन असेल,  लोकांनी आंदोलन केल्याशिवाय सरकार कोणालाही दाद देणार नाही. हुकूमशाही आणखी कडक होत जाईल. त्यामुळे गळ्याभोवती फास आवळत जाईल, अशी भीती पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्ती केलीये.

Follow Us
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव,
एकनाथ शिंदेंना वाराणसीत मोठा सन्मान; 'सनातन मार्तंड' पुरस्काराने गौरव, धर्मध्वजा धारक उपाधीही बहाल!
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय....
Sharad Pawar Health Update : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या सुरू
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?
पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
Payal Zambare Case : पायल झांबरे प्रकरणाच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर
आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित....
Umesh Patil On Rohit Pawar : आधी कर्जत-जामखेडमधून निवडून येणार का ते सांगा; उमेश पाटलांचा रोहित पवारांना थेट सवाल
राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या....
NCP Meeting Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची सुनेत्रा पवारांसमोर नाराजी; शिंदेंच्या खात्यांबाबत उपस्थित केले प्रश्न
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...