महाविकास आघाडीत कुरबूर, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही!

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली.

महाविकास आघाडीत कुरबूर, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही!

मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. “कोरोनाचं संकट गहिरं आहे. पण केंद्रातून दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. प्लाझमा थेरपीबाबत संभ्रम आहे. लॉकडाऊन करायचं की अनलॉक करायचं? केंद्राने नीट गाईडलाईन बनवली नाही, त्यांनी राज्यांवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे राज्य सरकारे आपआपल्या परीने निर्णय घेत आहेत”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. (Prithviraj Chavan on Thackeray government)

महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय कसा झाला याबाबत संभ्रम आहे. थेट महिनाभर लॉकडाऊन वाढवला. अनलॉक १, अनलॉक २ बाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते आणि अन्य पक्षाचे नेतेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. जिथे रुग्ण वाढले तिथे लॉकडाऊन ठिक आहे, हा निर्णय कसा झाला याबाबत चर्चा होईल, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरीवर भाष्य केलं.

बॅकसीट ड्रायव्हिंग नको

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना तुम्ही मुख्यमंत्रिपदी असताना प्रशासनावर पकड होती, सध्याची परिस्थिती काय आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. मी सध्या मुख्यमंत्री नाही, उद्धवजी मुख्यमंत्री आहेत. महत्त्वाच्या सूचना, सल्ला हवा असतो तेव्हा ते घेतात, प्रशासनाची पकड वगैरे काही योग्य नाही. प्रत्येकाची मतं आपआपली असतं, कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं ही आपआपली मतं असतात.  जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा असतो. पण बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. इतरांचे सल्ले घ्यायचे की नाही, प्रशासनाचं ऐकायचं की अन्य कुणाचा सल्ला घ्यायचा, राजकीय पुढाऱ्यांचा सल्ला घ्यायचा की राजकीय अनुभव असणाऱ्यांचा सल्ला घ्यायचा हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे”

कोरोनाचं संकट मोठं, त्याच्याबाबत कुणालाच अंदाज नाही, केंद्राने ICMR ने १५ ऑगस्टला लस बाजारात आणण्याचं सांगितलंय, पण मला आश्चर्य वाटतंय, हे नेमकं कसं होणार? धोरण काय? केंद्रात ताळमेळ नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

आरोग्य आणि आर्थिक हे वेगळे विषय, GST मुळे राज्याचे सर्व सोर्स बंद झाले आहेत, राज्यांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेता येत नाही, केंद्राने मदत केली नाही तर राज्यांवर मोठं संकट, केंद्रानेही कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

(Prithviraj Chavan on Thackeray government)

VIDEO : 

संबंधित बातम्या 

कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर   

भाजपच्या महामंत्रीपदी कुणाची वर्णी? शेलार, बावनकुळेंची नावं चर्चेत, मात्र पंकजा मुंडे, मेहतांवर फुली? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *