पुणे : पुणे महापालिका आयुक्त आणि सत्ताधारी भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त आमचं ऐकत नसल्याचा आरोप भाजपने केलाय. महापालिका आयुक्त हे महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप भाजपचे सभागृह नेते गणेश बीडकर यांनी केलाय. 23 गावांच्या विकास आराखड्यासंदर्भात न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीला महापालिकेकडून वकील दिला जात नसल्याचा आरोप बीडकर यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 गावांच्या विकास आराखड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगल्याचं दिसून येत आहे. (Possibility of clash between Pune Municipal Commissioner and BJP over development plan of 23 villages)