अहमदाबाद, चेन्नईकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश; विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला

मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश आहे, अशा शब्दात राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.  (Radhakrishna Vikhe Patil Criticises Shivsena)

अहमदाबाद, चेन्नईकडे बोट दाखवू नका, मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश; विखे-पाटलांचा शिवसेनेवर हल्ला

शिर्डी : “गेल्या 25 वर्षांपासून मुंबईत तुमचीच सत्ता आहे. या 25 वर्षांत मुंबईचे प्रश्न का सोडवण्यात आले नाहीत?,” असा सवाल करतानाच अहमदाबाद, चेन्नईकडे काय होतं हे सांगून दुसरीकडे बोट दाखवू नका. मुंबई तुंबली हे तुमचंच अपयश आहे, अशा शब्दात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.  (Radhakrishna Vikhe Patil Criticises Shivsena on Mumbai Waterlogging)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून मुंबई तुंबण्याची विविध कारणं देतानाच अहमदाबाद, चेन्नईतपाणी तुंबते तेव्हा विरोधक गप्प का बसतात? असा सवाल करण्यात आला आहे.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे-पाटील म्हणाले की, ”अहमदाबाद आणि चेन्नईत काय चालतं हे सांगू नका. दुसरीकडे बोट दाखवून आपलं अपयश झाकून ठेवता येत नाही. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई पालिकेत तुमची सत्ता आहे. त्यामुळे मुंबई तुंबली त्याचं अपयशही सर्वस्वी तुमचंच आहे.” हजारो कोटी रुपये खर्च करूनही मुंबई कशी तुंबते? नालेसफाईत अनेकांनी आपले हात साफ केलेत? असा सवाल करतानाच या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी मी विधानसभेत केली होती, असंही त्यांनी सांगितलं.

जर 24 तासांत 65 मिमी पाऊस झाला तर मदत मिळते हा जुना नियम आहे. अतिवृष्टीमुळे चार दिवसात अनेक भागात 100 मिमी पाऊस झाला आहे. तर काही ठिकाणी ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी भरले आहे. यात शेतकऱ्यांचा काही दोष नाही. त्यामुळे सरकारने 65 मिमी पाऊस होण्याची अट काढून टाकावी. ही अट अन्यायकारक असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (Radhakrishna Vikhe Patil Criticises Shivsena on Mumbai Waterlogging)

संबंधित बातम्या : 

मुंबई तुंबल्यावर बोंबा मारणारे नागपूर, अहमदाबाद जलमय झाल्यावर गप्प का? शिवसेनेची टीका

पाच वर्षे सुडाचे बळी ठरलो, पण सुडाचे राजकारण करणार नाही : धनंजय मुंडे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *