सुजय विखेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत वडील विखे पाटील म्हणतात…

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या आघाडीची चर्चा नगरच्या जागेवरुन खोळंबली आहे. कारण, ही जागा काँग्रेसला हवी असून राष्ट्रवादी जागा न सोडण्यावर ठाम आहे. त्यातच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पण यावर अजून निर्णय झाला नसून आघाडीत जो निर्णय होईल, त्यावर सर्व अवलंबून आहे, […]

सुजय विखेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत वडील विखे पाटील म्हणतात...
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या आघाडीची चर्चा नगरच्या जागेवरुन खोळंबली आहे. कारण, ही जागा काँग्रेसला हवी असून राष्ट्रवादी जागा न सोडण्यावर ठाम आहे. त्यातच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. पण यावर अजून निर्णय झाला नसून आघाडीत जो निर्णय होईल, त्यावर सर्व अवलंबून आहे, असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय.

सुजय राष्ट्रवादीत जाणार किंवा अपक्ष लढणार या चर्चा चुकीच्या आहेत. अजून जागावाटप पूर्ण झालेलं नाही. काँग्रेसला ही जागा मिळेल अशी अजूनही आशा आहे. सुजयने राष्ट्रवादीत प्रवेश करावा, असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आघाडीत जो निर्णय होईल तो मान्य केला जाईल, असं विखे पाटलांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीचं म्हणणं काय?

सुजय विखेंना राष्ट्रवादीत घेण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. जागावाटपाचा निर्णय हा आघाडीच्या बैठकीत होत असतो, त्यानुसारच सर्व निर्णय होईल, असं त्यांनी स्पष्ट केलंय. शिवाय नगरची जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही, ती जागा राष्ट्रवादीच लढणार, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी झाली आहे. मात्र, परंपरेने राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या नगर दक्षिण लोकसभेच्या जागेवरुन राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीला येत असल्याने, सुजय विखेंची मोठी गोची झाली आहे. किंबहुना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीतील दोन्ही पक्षात ज्या जागांवरुन तिढा होता, त्यात नगर दक्षिणच्या जागेचा समावेश होता. मात्र, आता सुजय विखे संपूर्ण डावच उलटवत राष्ट्रवादीत प्रवेश करुन, इथून लोकसभा लढणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

पद्मभूषण दिवंगत बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील वाद महाराष्ट्राला परिचित आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी कधीच सोडली नव्हती. पुढे अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील या पुढल्या पिढीच्या नेत्यांमध्येही कधी सूर जुळला नाही. या दोन्ही नेत्यांमध्येही कायम धुसफूस सुरुच असते. मात्र, आता सुजय विखे पाटील राष्ट्रवादीत प्रवेशाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विखे कुटुंबातील तिसरी पिढी पवार कुटुंबाशी जुळवून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दक्षिण नगरमधील राजकारणालाही आगामी काळात वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.