…तर सोलापुरात जाऊन आंदोलन करेन : विखे पाटील

...तर सोलापुरात जाऊन आंदोलन करेन : विखे पाटील


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआयने पंतप्रधान मोदींना काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. या कार्यकर्त्यांना सोलापूर पोलिसांनी गुंडगिरी करत बेदम मारहाण केली. या घटनेचा आता सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. कायदा हातात घेत गुंडगिरीचं दर्शन घडवणाऱ्या पोलिसांविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. दडपशाही करणाऱ्या पोलिसांना निलंबित केले नाही, तर सोलापुरात जाऊन आंदोलन करेन, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले?

“मोदींसमोर निदर्शने केली म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असते, तर समजू शकलो असतो. पण त्यांना अमानुष पद्धतीने लाथांनी तुडवण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? काँग्रेस कार्यकर्त्यांवर दडपशाही करणारे पोलीस निलंबित झाले नाही तर मी सोलापुरात जाऊन आंदोलन करेन.”, असा राधाकृष्ण विखे पाटील यांनी इशारा दिला आहे.

तसेच, “भाजपच्या लोकविरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी पंतप्रधानांच्या ताफ्यासमोर निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या अमानवी मारहाणीचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. लोकहिताचे निर्णय घ्यायचे नाही आणि त्याविरूद्ध कोणालाही बोलूही द्यायचे नाही, ही हुकूमशाहीच आहे.”, अशी टीकाही विखे पाटलांनी भाजपवर केली आहे.

VIDEO : सोलापुरात नेमके काय घडले?

संबंधित बातम्या :

सुरुवात मराठीत, भाषण हिंदीत, शेवट कन्नड, मोदींच्या भाषणाने नेते अवाक्

भूमीपूजन आणि उद्घाटन आम्हीच करतो, दिखाव्यासाठी काही नसतं : मोदी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI